लसणात आैषधी गुणधर्म असून मनुष्याच्या शरीरातील काही रोगांचे नियंत्रण करण्यास याचा उपयोग होतो. कंदवर्गीय पिकांमध्ये भारतात प्राचीन काळापासून व जगात एक महत्वाचे मसाल्याचे पीक म्हणून उपयोग केला जातो. भारतात मध्यप्रदेश, गुजरात, ओरिसा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये लसूण लागवडीत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव व सातारा हे लसूण पिकवणारे प्रमुख जिल्हे आहेत. आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता प्रती हेक्टरी सरासरी उत्पादकता ४ ते ५ टनात वाढ करून १० ते १२ टन मिळविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी लसणाच्या अधिक उत्पादन देणा-या जातींची लागवड व योग्य पीक उत्पादन पद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
आपल्या देशात सपाट मैदानी भागात लसणासाठी उपयुक्त हवामान नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान उपलब्ध असते. त्यामुळे देशभरात ९० टक्के लसणाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते. लसूण तापमानास संवेदनशील पीक असून भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्यात करणे योग्य आहे. लसूण हे पीक थंड हवेस प्रतिसाद देते. पण लसणाचा गडुा पक्व होत असताना व काढणीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानाची वाढ होते व त्याची संख्या वाढते. हा काळ साधारणपणे ४५ ते ५० दिवसांचा असतो. या काळात रात्रीचे तापमान १० ते १५ अंश सें.ग्रे. व दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सें.ग्रे च्या दरम्यान लागते. तसेच हवेत ७० ते ८० टके आद्रता व ११ ते १२ तास सूर्यप्रकाश हवा. यानंतर पाकळ्या पोसू लागतात व गडुा आकाराने वाढू लागतो. हा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. या काळात हवेतील आद्रता कमी व तापमान वाढलेले पाहिजे. त्यामुळे पात वाळणे, गडुा सुकणे या क्रिया सुलभ होतात. महाराष्ट्रात लसणाची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करावी. उशिरा लागवड झाली तर गड्यांचा आकार कमी होतो, वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते. थंड व पहाडी क्षेत्रात लावल्या जाणा-या जाती वेगळ्या असतात. या जातीमध्ये १० ते १२ पाकळ्या असतात, परंतु प्रत्येक पाकळ्याचे वजन ४ ते ५ ग्रॅम असल्यामुळे गडुा आकाराने मोठा असतो. या जाती महाराष्ट्रातील हवामानात येत नाहीत. केवळ पाने वाढतात व पाकळ्या तयार होत नाहीत.
लसणाचा गडुा जमिनीत पोसत असल्याने वाढीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत व कसदार जमीन लागते. जमिनीचा सामू ६ ते ७ असावा. जास्त क्षरीिय अथवा लावणीय जमिनीत उत्पादन कमी होते. मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा चांगला पुरवठा करून जास्त उत्पादन घेता येते. भारी काळ्या, चोपण, मुरमाड व हलक्या जमिनीत गडुा नीट पोसला जात नाही. यासाठी अशा जमिनी लसूण लागवडीसाठी टाळाव्यात.
लसूण हे पीक शाखीय अभिवृद्धी पद्धतीने लावले जाते. या पिकात फलधारणा होऊन बी तयार होत नसल्याने स्थानिक वाणातून निवड करून अधिक उत्पादन देणा-या नवीन जाती तयार करण्यात आल्या आहेत. काही जाती स्थानिक नावाने ओळखल्या जातात. जसे, पूर्वी जामनगर, महाबलेश्वर, लाड़वा, मलिक, फवारी, अमलेटा व राजेली गड़ी इत्यादी नावाने प्रचलित आहेत. गेल्या १० ते १२ वर्षात निरनिराळ्या कृषि संशोधन केंद्रात अनेक वाण गोळा करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू आहे. संशोधनातून गोदावरी (सिलेक्शन-२), श्वेता (सिलेक्शन-१०), अॅग्रेिफाऊंड व्हाईट (जी-४१), यमुना सफेद (जी-५०), जी-१, जी.जी.–२, जी-२८२, जी-३२३, फुले बसवंत, भीमा ओंकार इत्यादी जाती भारताच्या मैदानी भागाकरिता उपयुक्त आहेत. जी-४१ ही जात जांभळा करपा व तपकिरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव नसणा-या क्षेत्रात चांगले उत्पादन देते व साठवणक्षमता सुध्दा चांगली आहे. ही जात पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर, इत्यादी भागासाठी उपयुक्त आहे. फुले बसवंत व गोदावरी ही जात जांभळ्या रंगाच्या लसूण लागवडीसाठी उपयुक्त आहे. जी-५० या जातीत पाकळ्यांची संख्या 30 ते ४0 पर्यत असते.
सन २oo८-०९ मध्ये कोईम्बतूर येथे झालेल्या (ए.अय.सी.आर.पी.) (व्ही.सी.) च्या २६ व्या समूह बैठकीमध्ये भीमा ऑकार (आय.सी. ५६९७८९) या वाणाला ६ व्या विभागासाठी मान्यता आली/शिफारस करण्यात आली. कारण भीमा ओंकार ही जात भारतामध्ये (लसूण पीक घेत असणा-या) कोणत्याही भागात यशस्वीपणे वाढू शकते. विभाग ६ (गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली) लसणाची ही जात अधिकतम उत्पादन आणि चांगली प्रत यासाठी प्रसिद्ध आहे. नालंदा बिहार येथील स्थानिक वाणांची कृन्तक निवड करून ही जात विकसित केली आहे. या जातीच्या असतात. प्रत्येक कांद्यामध्ये १८ ते २० पाकळ्या असतात. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ४१.२ टक्क्यांपर्यंत असते. मध्यम हिरव्या रंगाची थोडीशी अवतल पाने विविध क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर केलेल्या उत्पादनाच्या पाहणीनुसार उत्पादनाचे प्रमाण ८० ते १४o किंवटल प्रती हेक्टर पर्यंत असते. सरासरी उत्पादन १o७.६ किंवटल प्रती हेक्टर एवढे असते. पानांच्या रोगांना प्रतिकारक्षम आहे.
भीमा परपल (आय.सी. ५७o७४२) ही जात लसूण पीक घेत असणा-या | भारतातील कोणत्याही भागात यशस्वीपणे वाढू शकते. म्हणूनच विभाग ३ (दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा बिहार आणि पंजाब) आणि विभाग ४ (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश) या विभागांसाठी भीमा परपलला मान्यता देण्यात आली/शिफारस करण्यात आली. लसणाची ही जात अधिकतम उत्पादन आणि चांगली प्रत यासाठी प्रसिद्ध आहे. मध्यम आकाराचा एकसंध जांभळट रंग असणारा, १६ ते २o कळ्या/ पाकळ्या असणारा कांदा (बल्ब) असतो. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ३३.६ टक्के आणि अॅसिलिन (ताज्या वजनाच्या) प्रमाणे २.५ मि.ग्रॅ. प्रती ग्रॅम तसेच सुकवलेल्या वजनाच्या प्रमाणे ९६ मि.ग्रॅ. प्रती ग्रॅम प्रमाणे असते. मध्यम हिरव्या रंगाची थोडीशी अवलत पाने असतात. सरासरी उत्पादन ६ ते ७ टन प्रती हेक्टर एवढे असते.
लसणाची लागवड पाकळी लावून करतात. यासाठी सुधारित जातींचे शुद्ध व खात्रीलायक बेणे वापरावे. पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुद्रयाला अथवा पाकळ्यांना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. साधारणपणे १ ते १.५ ग्रॅम वजनाच्या पाकळ्या लागवडीसाठी लागवडीसाठी वापरू नयेत. लहान पाकळ्या लावल्या तर गडु उशिरा तयार होतात व उत्पादन कमी मिळते. मागील हंगामात तयार झालेल्या थंड व कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गडु लागवडीसाठी निवडावेत. एक हेक्टर क्षेत्र लसूण लागवडीकरिता पाकळ्यांच्या आकारानुसार ३00 ते ५oo किलोग्रॅम लसूण लागतात.
उन्हाळ्यात खोल नांगरट करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या घालाव्यात. लसणाचे गडे जमिनीत पोसतात व त्यांची मुळे १५ ते २० सें.मी. खोलीपर्यंत जात असल्याने जमिनीचा ३0 ते ४0 सें.मी. पर्यंतचा भाग भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लसणाची लागवड सपाट वाफ्यात केली जाते. त्यासाठी जमिनीच्या उताराप्रमाणे ४ × २ किंवा ३ x २ मीटर अंतराचे सपाट वाफे तयार करावेत. जमिनीचा उतार जास्त असल्यास लहान आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. जमीन सपाट असल्यास १.५ ते २ मीटर रुंद व १o ते १२ मीटर लांब सरी वाफे तयार करून लागवडीसाठी वापरता येतात. लागवडीसाठी निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात रुंदीशी समांतर १५ सें.मी. अंतरावर खुरप्प्याने रेघा पाडून त्यात १० सें.मी. अंतरावर पाकळ्या उभ्या लावून कोरड्या मातीने झाकाव्यात. उभ्या पाकळ्या लावल्यामुळे एकसारखी उगवण होते. सपाट वाफ्यात ढेकळे जास्त असल्यास हलके पाणी देऊन वापर कांदा व लसूण पिकात होत आहे. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने गेली तीन वर्षे कांदा व लसणासाठी ठिबक व तुषार सिंचनाचे प्रयोग केले. या पद्धतीने पाणी देण्यासाठी रानबांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते. यासाठी १२0 सें.मी. रुंदीचे ४0 ते ६0 मीटर लांबीचे व १५ सें.मी. उंचीचे गादी वाफे ट्रॅक्टरला जोडता येणा-या सरी यंत्राने तयार करावेत. सरी यंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्टर चालविला तर १२0 सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो व वाफ्याच्या दोन्ही कडेला ७५ सें.मी. रुंदीच्या दोन सा-या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, नळ्यांचे व पिकांचे निरीक्षण करणे इत्यादी कामासाठी होतो. तुषार किंवा ठिबक सिंचनासाठी पाईप, उपपाईप व ठिबक नळ्या यांची शेतात कायमची सोय करणे आवश्यक असते. ठिबक किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच चालवून वाफ्यांना पाणी द्यावे व नंतर वाफ्यावर पाकळ्याची टोकणी करावी. लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या १0 लीटर पाण्यात २0 मि.ली. कार्बोसल्फान व १५ ग्रॅम कार्बन्डॅझिमच्या द्रावणात दोन तास बुडवून मग लागवड करावी. या संबंधी प्रात्यक्षिक व तांत्रिक सल्ला केंद्रावर दिला जातो.
लसूण लागवडीनंतर सुरवातीच्या काळात रोपांची वाढ हळू होते. तसेच दोन रोपातील अंतर कमी असल्याने खुरपणी करताना रोपांना इजा होण्याची भिती असते. सुरवातीस गवताचे रोप बारीक असल्याने खुरपणी उरकत नाही. अशा परिस्थितीत रासायनिक तणनाशकाचा उपयोग करणे व्यवहार्य ठरते. लसणामध्ये तणाचे बी रुजून येण्यापूर्वी गोल, स्टॉप अथवा बासालिनसारख्या तणनाशकाचा वापर करता येतो. त्यासाठी १५ मि.ली. गोल किंवा बासालिन १o लीटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणीसाठी विशिष्ट प्रकारच्या नोझलचा वापर करावा. वाफ्यात फवारणी केल्यानंतर लगेच पाणी देणे आवश्यक आहे. यामुळे साधारणतः ३० ते ३५ दिवस गवताची उगवण झाल्यास खुरपणी आवश्यक आहे. खुरपणीमुळे जमिनीचा वरचा भाग मोकळा होऊन हवा खेळती राहते व पीक उत्तम येते. लव्हाळा व हराळीचा बंदोबस्त पूर्वमशागतीनेच होऊ शकतो. खोल नांगरट करून लव्हाळ्याच्या गाठी व हराळीच्या काशा वेचणे हा प्रभावी उपाय आहे.
लसणाच्या उत्तम वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी शेणखताची गरज असते. हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत मशागत करतेवेळी जमिनीत मिसळावे. या व्यतिरिक्त नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक खतातून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जमिनीसाठी १oo किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रती हेक्टर देण्याची शिफारस आहे. ५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश याची मात्रा पाकळ्यांची टोकण करण्यापूर्वी द्यावी. उरलेली नत्राची मात्रा दोन भागात किंवा हप्त्यात विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीनंतर ३० दिवसाने व दुसरी मात्रा ४५ ते ५० दिवसांनी द्यावी. नत्राची मात्रा लागवडीनंतर ६० दिवसांनी देऊ नये. त्यामुळे उत्पादन व साठवणीवर विपरीत परिणाम होतो. अलीकडेच करण्यात आलेल्या प्रयोगावरून कांदा व लसूण ही पिके गंधकयुक्त खतास प्रतिसाद देतात, असे दिसून आले आहे. म्हणून भरखते देताना अमोनियम सल्फेट व सुपर फॉस्फेट यासारख्या खतांचा उपयोग केल्यास आवश्यक गंधकाची मात्रा पिकास मिळते. मिश्रखते वापरल्यामुळे आवश्यक गंधकाची पूर्ती होत नसल्याने लागवड करण्यापूर्वी प्रती हेक्टर ५o किलो गंधक जमिनीत मिसळावे. सल्फेक्स ८५ वेटेबल पावडर १.५ ते २ ग्रॅम या प्रमाणात पाण्यात चिकटणा-या पदार्थाबरोबर मिसळून फवारणी करणे लाभदायक असते. शेणखताच्या कमी वापरामुळे सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. यासाठी आवश्यक असल्यास झिंक फॉस्फेट, मॅगेनीज सल्फेट व कॉपर सल्फेट यांची फवारणी 0.५ टक्के तर फेरस सल्फेटची फवारणी 0.५ ते 0.१ टक्के या प्रमाणात करावी.
लसणाची मुळे जमिनीच्या १५ ते २० सें.मी. च्या थरात असतात. त्यामुळे वरच्या थरात ओलावा कायम असणे आवश्यक असते. या पिकास जुजबी परंतु नियमित पाणी लागते. लसणाच्या पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. आंबवणी साधारणत: ३ ते ४ दिवसांनी द्यावे. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात १o ते १२ दिवसांनी
ठिबक किंवा तुषार सिंचन संच दररोज चालवण्याचा सरासरी कालावधी
महिना | ठिबक सिंचन संच (मिनिट ) | तुषार सिंचन संच (मिनिट) | बाष्पीयभवनाचा सरासरी वेग मी.मी मध्ये (राजगुरुनगर किंवा तस्यम हवामानाच्या भागात ) |
---|---|---|---|
ऑक्टोंबर | १४ ते १८ | ४२ ते ५३ | ३.५० ते ४.४१ |
नोव्हेंबर | १३ ते १७ | ३८ ते ५१ | ३.२३ ते ४.३५ |
डिसेंबर | ११ ते १६ | ३२ ते ४६ | २.६६ ते ३.८६ |
जानेवारी | १२ ते १५ | ३६ ते ४४ | २.५३ ते ३.७३ |
फेब्रुवारी | २२ ते २८ | ६७ ते ८३ | ५.५६ ते ६.९४ |
लागवड करण्यापूर्वी ठिबक किंवा तुषार सिंचन चालू करून वाफ्याचा १५ ते २० सें.मी. खोलीपर्यंतचा भाग पूर्ण ओला होईपर्यंत पाणी द्यावे. त्यासाठी संच ८ ते १o तास चालवावा लागेल. त्यानंतर मात्र बाष्पीभवनाद्वारे जेवढे पाणी उडून जाईल तेवढेच पाणी देण्यासाठी पंप चालवावा लागतो. एक एकरासाठी किती वेळ संच चालवावा हे वर दिलेल्या माहितीवरुन ठरवता येते. संच दररोज न चालवता दर तिस-या दिवशी जमीन व हवामान बघून चालवला तरी चालते. दोन दिवसांचा संच जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणपणे १२ ते १५ पाण्याच्या पाळ्या लागतात. ठिबक व तुषार सिंचनावर लसणाची वाढ चांगली होते. उत्पादन अधिक येते. पाण्याची बचत होते व तण किडींना उपद्रव कमी होतो. तसेच नत्रयुक्त खताची बचत होते. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने गेली तीन वर्षे ठिबक व तुषार सिंचनावर प्रयोग केले आणि निष्कर्षानुसार जवळ-जवळ ४० टक्के पाण्याची बचत व उत्पादनात १५ ते २0 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. ठिबक सिंचनाखाली इनलाईन ड्रिपर असणा-या १६ मि.मी. जाडीच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रिपरमधील अंतर ३0 ते ४० सें.मी. असावे. त्याची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता २.५ ते ४ लीटर प्रती ताशी असावी. तुषार सिंचनासाठी ताशी १३५ ते १५० लीटर पाणी ६ ते ७ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावेत. तुषार सिंचनासाठी पाणी चांगले असावे. क्षारमिश्रित पाणी असेल तर पिकांचे नुकसान होते. अशावेळी ठिबक सिंचन उपयक्त ठरते. तुषार सिंचनाचा संच चालविण्यासाठी उच्च दाबाचा व जास्त अश्वशक्तीचा पंप (४0 मीटर हेड व ७.५ अश्वशक्ती) आवश्यक असतो. या तुलनेत ठिबक सिंचन संच ३ अश्वशक्तीच्या मोटोरीने चालू शकतो.
या पद्धतीमध्ये पाणी देण्यासाठी बाष्पीभवनाचा वेग, पिकाची अवस्था, जमिनीचा प्रकार व लागवडीचे अंतर यांचे गुणोत्तर काढून पाण्याची दररोजची गरज काढली जाते. पाणी देण्यासाठी ड्रिपर किंवा तुषारचा नोझल याचा पाणी बाहेर टाकण्याच्या ताशी दर यावरुन पंप किती वेळ चालवायचा हे ठरवले जाते. कोणत्या महिन्यात पंप किती वेळ चालवला तर पाण्याची गरज भागेल यावर राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने लसणासाठी पाणी देण्याचे कोष्टक खालीलप्रमाणे तयार केले आहे. जमिनीचा पोत, लागवडीचा हंगाम व हवामानानुसार यात आवश्यकतेनुसार काही बदल करू शकतात.
चालवण्याचा कालावधी एकत्र करून पाणी दिले तरी चालते.
फुलकिडे किंवा टाक्या : ही प्रमुख नुकसानकारक कोड आहे. हे किडे अतिशय लहान असून दिवसा पानाच्या बेचक्यात लपून राहतात. रात्री किंवा सकाळी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पातीवर पांढरे ठिबके पडून रोपांची पाने वेडीवाकडी होतात. पानांना इजा झाल्यास कांदा नीट पोसत नाही. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोगाचे प्रमाण देखील वाढते. उपाय : गरजेनुसार दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने ही औषधे १० लीटर पाण्यात चिकट द्रावणाच्या बरोबर मिसळून आलटून-पालटून फवारावीत. सायपरमेश्रीन शक्य असेल तर सर्वात शेवटी फवारावे. या सोबत गरज असल्यास बुरशीनाशकांचा वापर करता येतो.
कीड नियंत्रणाकरिता आैषधाचा वापर
कीडनाशक | सांद्रता | आैषधे/लिटर | एक हेक्टर करिता लागणारे आैषधे | उपाय /महत्व | |
---|---|---|---|---|---|
कार्बोसल्फान | २५ इ सी | २ मी.ली. | १.८ लिटर | फुलकिडे | |
सायपरमेथ्रीन | १० ई सी | ०५ मी.ली. | ४५० मी.ली. | फुलकिडे | |
निम्बेसिडीन+सायपरमेथ्रीन | १० ई. सी. | ३.० मी.ली.+०.५ मी.ली. | २.७ ली. +४५० मी.ली. | अळी | |
प्रोफोनोफॉस | ५० ई सी | १ मी.ली. | ९०० मी.ली. | फुलकिडे | |
फास्फेमीडॉन | ८५ डब्लू एस सी | १ मी.ली. |
|
फुलकिडे | |
मीथाइल ओक्सिडेमेटॉन | २५ ई सी | २ मी.ली. | १.८ लिटर | फुलकिडे | |
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन | - | ०.५ मी.ली. | ४५० मी.ली. | फुलकिडे | |
डायकोफॉल | १८ ई सी | २ मी.ली. | १.८ लिटर | लाल कोळी | |
इथीऑन | - |
|
१.८ लिटर | लाल कोळी | |
घुलनशील गंधक +मोनोक्रोटोफॉस | ८० डब्लू .पी | १.५ ग्रॅम +१.५ मी.ली. | १.३ कि.ग्रॅ+१.३ लिटर | लाल कोळी | |
स्टिकर्स | - | ०.६ ते १ मी.ली. | ५५० ते ९०० मी. ली. | सर्व कीडनाशक व रोगनाशकासोबत मिसळावे . |
टिप : फवारणीसाठी पाण्याचे प्रमाण कांद्याच्या वाढीनुसार ५०० ते ९०0 लीटर/हेक्टर वापरावे. प्रत्येक फवारणीच्या द्रावणात स्टिकर जरूर वापरावा. रोग व कोडनाशक औषधे आलटून-पालटून फवारावीत.
तपकिरी करपा : हा बुरशीजन्य रोग असून पानावर पिवळसर रंगाचे लांब चट्टे पडतात. चठ्ठयांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. पिकांच्या कीटकनाशकासोबत आलटून-पालटून फवारावे.
बाल्यावस्थेत हा रोग झाल्यास झाडांची वाढ खुटते, गडुा लहान राहतो. प्रसंगी पूर्ण झाड मरते. या रोगाचा प्रादुर्भाव डिसेंबर ते जानेवारी महिन्यात जास्त होतो.
उपाय : २५ ते ३0 ग्रॅम डायथेन एम-४५ आणि काबॅन्डॅझिम २0 ग्रॅम द्रावणात चिकटपणा वाढविणारे स्टिकर जरुर मिसळावे. फवारणी १0 ते १५ दिवसांच्या अंतराने करावी.
जांभळा करपा: या बुरशीजन्य रोगात सुरवातीस खोलगट, लांबट, पांढुरके चट्टे पडतात. चठ्ठयांचा मधील भाग प्रथम जांभळट व नंतर काळपट होतो. असे अनेक पट्टे एकमेकांना लागून असल्यास पाने काळी पडून वाळतात. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात ढगाळ वातावरण राहून आर्द्रता वाढली तर या करप्याचे प्रमाण वाढते.
उपाय : या रोगाच्या बंदोबस्तासाठी दर १o ते १५ दिवसांच्या अंतराने २५ ते ३0 ग्रॅम डायथेन एम-४५, कार्बन्डॅझिम २0 ग्रॅम १0 लीटर पाण्यात कीटकनाशकासोबत आलटून पालटून फवारावे
गडुा कूज : साठवणुकीत किंवा शेतात ही बुरशी लसणाच्या गडुयावर वाढते. ही बुरशी पाकळ्यांच्या आत शिरल्याने पाकळ्या मऊ पडतात व त्यावर निळसर पावडर जमा होते.
उपाय : लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे. लागवडीनंतर वाफ्यास भरपूर पाणी द्यावे .
बुरशीनाशक | आैषधे/लिटर पाण्यात | उपाय / महत्व |
---|---|---|
मेन्कोझेब | २.५ ग्रॅम | बहुआयामी बाह्य स्पर्श , जांभळा करपा ,तपकिरी करपा |
क्लोरेथेलोनील | २ ग्रॅम | बहुआयामी बाह्य स्पर्श , जांभळा करपा ,तपकिरी करपा |
कार्बेनडॅझिम | १ ग्रॅम | गड्डा कुज |
प्रोपीकोनाझोल | १ मी.ली. | जांभळा करपा,तपकिरी करपा |
कॉपर ऑक्सिक्लोराईड | ३ ग्रॅम | बहुआयामी बाह्य स्पर्श , जांभळा करपा ,तपकिरी करपा |
ट्रायकोडमा | १ कि./क्वी.शेणखत | शेणखतासोबत १ कि ./क्वी. शेणखत या प्रमाणात १५ दिवस अगोदर मिसळून जमिनीत टाकावे. |
लसणाचे पीक साधारणपणे १२0 ते १३0 दिवसात काढणीला येते.
गड्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते. पाने पिवळी पडतात व शेंडे वाळतात. मानेत लहानशी गाठ तयार होते. त्यास लसणी फुटणे असे म्हणतात. पाने पूर्ण वाळण्यापूर्वी काढणी करावी. जेणेकरून पानांची वेणी बांधणे सोपे जाते. लसूण लहान कुदळीने किंवा खुरप्प्याने खोदून काढावा. काढलला लसूण दोन दिवस तसाच शतात ठवावा. ठवताना गडुष्याचा भाग पानांनी झाकला जाईल याची काळजी घ्यावी. दोन दिवसानंतर पाने आंबट-ओली असताना २० ते ३० सारख्या आकाराच्या गड्यांची वेणी बांधावी. अशा गडुया झाडाखाली अथवा हवेशीर छपरात १० ते १५ दिवस सुकवाव्यात. यानंतर लहान गडु व फुटलेल्या गड्यांची प्रतवारी करून वगळ्या कराव्यात व गडुया साठवणगृहात ठवाव्यात. बाजारात विक्रीसाठी पाठविताना वाळलेली पात कापून गडुष्यांची प्रतवारी करून बारदानाच्या गोणीत भरुन विक्रीसाठी पाठवाव्यात. या पद्धतीने शेतक-यांनी लागवडीचे तंत्र आत्मसात केले तर रब्बी हंगामात भरपूर लाभ मिळू शकतो.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात लसूण या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे...
कांदा- मुळा- भाजी, अवघी विठाई माझी या पंक्ती शेती...
सांगली जिल्ह्यातील नायकलवाडी (ता. वाळवा) येथील तरु...
लसूण लागवडीसाठी मध्यम प्रतीची चांगल्या निचऱ्याची ज...