कुल:- बिक्सासी
इंग्रजी नाव:- अन्नारटो अथवा अन्नाटटो प्लान्ट
भारतीय नाव:- सिंदुरि (संस्कृत), सिंदुरिया, लटकन (हिंदी), रंगमाले (कानडी), सप्पिरा विरै, उरागुमंजल (तमिळ)
जाती (स्पिसिज):- बिक्सा ओरेलाना
बिक्सा ओरेलाना ह्या जातीच्या झुडूपापासून सिंदूर हे लाल द्रव्य (करॅटोनोईड) मिळवले जाते. ह्याच्या बियांना आजकाल व्यापारी महत्व येऊ लागले आहे कारण रंगद्रव्य म्हणून त्याचा अधिकाधिक वापर होतो आहे. अन्नारटोची पिकलेली फळे वाळवून त्यांमधून निघणाऱ्या बिया म्हणजे सिंदुरी रंगाच्या उत्पादनाचा कच्चा माल होय.
हे काटक झाड असून त्याच्या वाढीसाठी अतिशय चांगल्या कसाच्या जमिनीची गरज नसते. पाणी धरून घेणारी कोणतीही जमीन ह्यास चालते. मात्र पाणबोडाद होणारी व दगडगोटे मिश्रित जमीन टाळा.
ही उष्ण कटिबंधीय वनस्पती आहे. उष्ण, कोरड्या हवेमध्ये हिचे पीक व्यवस्थित घेता येते. मात्र हिला धुके/हिम चालत नाही व त्यामुळे अशा प्रदेशात हिचे पीक घेऊ नये.
हिच्या कोणत्याही जातीचे आजपर्यंत नामकरण झालेले नाही.
अ.क्र. |
वस्तू |
दर एकरी |
दर हेक्टरी |
१ |
रोपांची संख्या |
२०० |
५०० |
२ |
शेणखत (टन) |
१० |
२५ |
३ |
खते (टन) NP2Os |
सध्यातरी हे झाड कुम्पांसाठी अथवा रस्ताच्या कडेलाच लावले जात असल्यामुळे खते देण्यासंबंधी माहिती उपलब्ध नाही. |
सध्यातरी हे झाड कुम्पांसाठी अथवा रस्ताच्या कडेलाच लावले जात असल्यामुळे खते देण्यासंबंधी माहिती उपलब्ध नाही. |
रोपवाटिका तयार करण्यासाठी योग्य काळ म्हणजे एप्रिल-मे. अन्नाटटोची वृद्धी बिया अथवा खोडाच्या कटिंग्ज द्वारे करता येते.
रोपांची वाढ पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती-वाळू-खताचे मिश्रण भरून करतात. ८-१० दिवसांनी बिया अंकुरतात. मात्र एका पिशवीमध्ये एकच रोप वाढवले जाते.
आजपर्यंत ह्यावर कोणत्याही किडीने अथवा गंभीर रोगाने हल्ला केल्याचे आढळलेले नाही.
स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम
अंतिम सुधारित : 5/29/2020