खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत.
मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी.
उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरु होताच कुळावच्या पाळ्या मारुन सपाट करावी. धसकटे वेचून घ्यावीत. याच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
सुधारित वाण
मुगाच्या सुधारित जाती
१ |
कोपरगाव |
कालावधी ६५ ते ७० दिवस, मर व करपा, पिवळा केवडा रोग प्रतिकारक्षम, उत्पादन ३-१० क्विं/हे |
२ |
बीएम ४ |
कालावधी ६५ ते ६७ दिवस, करपा व भूरी रोगास प्रतिकारक, मध्य भारतासाठी शिफारस, उत्पादन ३ ते ११ क्विं/हे |
३ |
बीपीएमआर १४५ |
कालावधी ६० ते ६५ दिवस, भुरी, करपा व पिवळा केवडा रोगास प्रतिकारक, उत्पादन ७ ते ८ क्विं/हे |
४ |
बीएम २००२-१ |
कालावधी ६५-७० दिवस, भूरी रोगास प्रतिकारक, उत्पादन ७ ते ९ क्विं/हे, सर्वात जास्त प्रथिने (२३:९० टक्के) |
५ |
बीएम २००३-२ |
कालावधी ६५ ते ७० दिवस, उत्पादन ८ ते १० क्विंटल/हे, शेंगा लांब असून मोठ्या आकाराचे, चमकदार दाणे |
६ |
पी के व्ही एफे एम -४ |
कालावधी ७०-७५ दिवस, उत्पादन १० ते ११ क्विं/हे |
७ |
पी.के.व्ही. ग्रीन गोल्ड |
कालावधी ७०-७५ दिवस, उत्पादन १० ते ११ क्विं/हें. एकाच वेळी पक्वता येणारा वाण |
८ |
वैभव |
कालावधी ७० ते ७५ दिवस, भुरी रोगास प्रतिकारक, टपोरे हिरवे दाणे, उत्पादन १४-१५ क्विं/हे |
उडदाच्या सुधारित जाती
१) |
बीडीयू -१ |
दाणे मध्यम ते काळ्या रंगाचे व टपोरे, कालावधी ७० ते ७५ दिवस, उत्पादन ११-१२ क्विं/हे |
२) |
टीएयु -१ |
कालावधी ७० ते ७५ दिवस, भूरी रोगास प्रतिकारक, उत्पादन १०-१२ क्विं./हे |
३) |
टीपीयु-४ |
कालावधी ६५ ते ७० दिवस, उत्पादन १० ते ११ क्विं/हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी शिफारस |
४) |
टीएयु २ |
कालावधी ७० ते ७५ दिवस, विदर्भासाठी प्रसारित, उत्पादन १०-१२ क्विं/हे |
५) |
पी के व्ही उडीद १५ |
कालावधी ६५ ते ७० दिवस, विदर्भासाठी प्रसारित, उत्पादन १०-१२ क्विं./हे |
कालावधी ६५ ते ७० दिवस, विदर्भासाठी प्रसारित, उत्पादन १०-१२ क्विं./हे
पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यान करावी पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येते
हेक्टरी १० ते १५ किलो बियाणे पुरेसे आहे पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बाविस्टीन १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम चोळावे. तसेच ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम किलो बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकांचे नुकसान होत नाही. त्याचबरोबर १० किलो बियाण्यास जिवाणु संवर्धक रायझोबियम व पीएसबी प्रति २५० ग्रॅम लावून पेरणी करावी.
माहिती स्रोत : कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/3/2020