मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी योग्य पाऊस होताच वाफसा आल्यावर पेरणी करावी.
बीजप्रक्रिया - १ किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझीम चोळावे. यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.
सुधारित वाण :
अ.नं. |
वाण |
प्रसाराचे वर्ष |
पिकाचाकालावधी(दिवस) |
उत्पादन क्विं./हे. |
वैशिष्ट्ये |
लागवडीचा प्रदेश |
चवळी वाण |
||||||
१. |
कोकण सदाबहार (VCM - ८) |
१९९६ |
६०-६५ |
१२-१५ |
लवकर तयार होणारा वाण, वर्षभर लागवडीसाठी योग्य, मध्यम आकाराचे दाणे |
महाराष्ट्र |
२. |
कोकण सफेद |
१९९९ |
७०-७५ |
१४-१६ |
टपोरे सफेद दाणे |
महाराष्ट्र |
३. |
फुले पंढरी |
२००७ |
७०-७५ |
१४-१६ |
तांबडे मध्यम दाणे |
महाराष्ट्र |
माहिती स्रोत : कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/23/2020