অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान

नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर (NMSA) हे अभियान कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे अभियान विशेषत: पर्जन्य आधारित भागांसाठी, एकात्मिक शेती, पाण्याचा कार्यक्षमतेने वापर, माती/जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन आणि साधनसंपत्तीचे संवर्धन या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.

अभियानाची उद्दिष्टे

 1. शेती अधिक उत्पादनक्षम, शाश्वत, फायदेशीर आणि हवामानाशी जुळवून घेणारी करण्यासाठी स्थानाशी अनुकूल एकात्मिक / संमिश्र शेती पध्दतीचा प्रसार ;
 2. माती आणि मातीचा ओलावा संवर्धन करण्याचे योग्य उपाय करून नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवणे;
 3. जमिनीचा कस/सुपीकता दाखवणा-या नकाशांच्या आधारे, मातीतील मॅक्रो आणि मायक्रो पोषक द्रव्यांच्या चाचणीवर तसेच खते इत्यादींच्या योग्य वापरावर आधारित मातीच्या व्यापक आरोग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे;
 4. पाण्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे जलसंपदेचा योग्य वापर करून शेतीचा विस्तार वाढवणे – ‘पाण्याच्या प्रत्येक थेंबामागे जास्तीत जास्त पीक घेणे’;
 5. नॅशनल मिशन ऑन ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड टेक्नॉलॉजी, नॅशनल फुड सिक्युरिटी मिशन, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर क्लायमेट रेजिलियंट ऍग्रिकल्चर (NICRA) यासारख्या इतर चालू अभियानांच्या सहयोगाने शेतकरी आणि हितसंबंधी लोकांची हवामानातील बदलाशी जुळवून घेणारी आणि त्याचे परिणाम सौम्य करण्याची क्षमता विकसित करणे;
 6. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरेंटी स्कीम (MGNREGS), इंटीग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्रॅम (IWMP), RKVY इत्यादी उपक्रम/अभियानाद्वारे उपलब्ध झालेले स्त्रोत वापरून तसेच NICRA च्या माध्यमातून सुधारून घेतलेले पर्जन्य आधारित तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात आणून पर्जन्य आधारित शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी निवडक ब्लॉकसमधे मार्गदर्शक मॉडेल्स हाती घेणे आणि
 7. नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज (NAPCC) च्या अंतर्गत नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चरची अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासन विभागात/ मंत्रालयात तसेच अंतर्विभागीय समन्वय प्रस्थापित करणे.

अभियानाचे धोरण

 • एकात्मिक शेती प्रणालीचा प्रसार करणे ज्यात पिके, पशुधन व मासेमारी, वृक्ष लागवड तसेच चा-याची संयुक्त शेती या द्वारे जीवनमान उंचावण्याच्या संधी निर्माण करणे, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पिकाचे नुकसान झाल्यास जोड/ उप उत्पादन प्रणालींद्वारे जोखीम कमी करणे;
 • स्त्रोत संवर्धन तंत्रज्ञानाचा (दोन्ही - कृषी अंतर्गत आणि कृषी बाह्य) प्रसार करणे आणि नैसर्गिक आपत्ती जसे दीर्घकाळ अवर्षण, पूर इत्यादी गोष्टींचा परिणाम कमी करणारे उपक्रम सुरू करणे;
 • तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराद्वारे उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांचे व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करणे. जोडीने, मागणी आणि पुरवठ्यासंबंधी उपाययोजनांचा यासाठी प्रसार करणे;
 • कृषि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे, मातीचा दर्जा सुधारण्यासाठी उपाय करणे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे, रसायने/उर्जेचा योग्य वापर आणि मातीमधे कार्बनचा संचय वाढवणे;
 • जमिनीच्या वापराचे सर्वेक्षण, मातीचा अभ्यास आणि मातीचे विश्लेषण करून मातीच्या स्त्रोतांवरील माहितीचा GIS प्रणाली वापरून डेटाबेस तयार करणे. ज्याच्या उपयोगाद्वारे स्थान आणि मातीस अनुकूल, तसेच खतांचा योग्य वापर करणारी व्यवस्थापन प्रणाली राबवणे;
 • मातीचे आरोग्य सुधारणे, पिकाची उत्पादकता वाढविणे, जमीन आणि जलस्रोतांचा दर्जा राखणे यासाठी स्थान आणि पिकांशी निगडीत अशा एकात्मिक पोषण व्यवस्थापन पध्दतींना प्रोत्साहन देणे;
 • ज्ञानसंस्था आणि व्यावसायिकांना सहभागी करून, विशिष्ट कृषी हवामान घटनांमुळे होणा-या बदलांची तीव्रता कमी करणा-या आणि त्याच्याशी जुळवून घेणा-या धोरणांना योग्य शेती प्रणालीद्वारे प्रोत्साहन देणे;
 • निवडक ब्लॉक्समधील हवामानाच्या घटकांना अनुकूल, जमिनीच्या क्षमतेनुसार एकात्मिक विकासाचा प्रसार सुनिश्चित करण्यासाठी पर्जन्य आधारित तंत्रज्ञान आत्मसात करून कार्यक्रमबध्द मार्गदर्शक हस्तक्षेप करणे जो वंचित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पोहोचेल. तसेच MGNREGS, IWMP, RKVY, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM), मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टीकल्चर (MIDH),  नॅशनल मिशन फॉर ऍग्रिकल्चर एक्स्टेन्शन अँड टेक्नोलॉजी (NMAE&T) इत्यादी संस्थांमधील समन्वय आणि प्रयत्नांच्या एकीकरणाद्वारे स्थानिक पातळीशी निगडीत विशेष योजना बनवणे.

अभियानाचा हस्तक्षेप

NMSA ने हाती घेतलेले चार मुख्य कार्यक्रम किंवा उपक्रमः

पर्जन्य आधारित क्षेत्र विकास  (RAD)

RAD, क्षेत्रावर आधारित विकास आणि शेती प्रणालीसह नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनाची पध्दत वापरते.

ह्या घटकाची जुळणी ‘वॉटरशेड अधिक फ्रेमवर्क’ सूत्राने म्हणजेच मूलभूत नैसर्गिक स्त्रोतांची क्षमता वापरणे/वॉटरशेड विकासाद्वारे निर्मित उपलब्ध साधनसंपत्ती/ MGNREGS, NWDPRA, RVP&FPR, RKVY, IWMP इत्यादीखाली हाती घेतलेले माती संवर्धन उपक्रम ह्यातून झाली आहे.

हा घटक पिके, फलोत्पादन, पशुधन, मासेमारी, वनीकरण यासारखे कृषी आधारित तसेच मूल्यवर्धन करणारे उपक्रम एकत्रितपणे राबवून तयार केलेल्या उचित शेतीप्रणालीचा परिचय करून देतो.

याशिवाय मातीचे परीक्षण/मातीच्या स्वास्थ्य कार्डावर आधारित पोषण व्यवस्थापन पद्धती, शेतीचा विकास, स्त्रोताचे संवर्धन आणि स्थानिक शेती हवामानाशी जुळवून घेणा-या पिकाची निवड यासारख्या गोष्टींना या घटकांखाली प्रोत्साहन देण्यात आले आहे.

100 हेक्टर किंवा अधिक जमिनीच्या (गावांतील लगतच्या किंवा दुर्गम क्षेत्रामधे लगत नसलेल्या किंवा नजीकच्या गावांच्या क्षेत्रातील जमिनीचा) क्लस्टरवर काम केल्यास एकत्रीकरणाचा सहज लक्षात येणारा परिणाम साध्य होईल आणि स्थानिक सहभागास प्रोत्साहन मिळून मोठ्या भागात सदर मॉडेलची पुनरावृत्ती करता येईल.

या घटकातून मिळणारे पूरक सहाय्य हे एकत्रीकरणाच्या कार्यक्रमात स्त्रोत संवर्धनातील तफावत भरून काढण्यास ग्राह्य समजण्यात येतील.

प्रस्तावित हस्तक्षेप मान्य होण्यासाठी RAD  क्लस्टरमधे माती विश्लेषण/ मातीचे स्वास्थ्य कार्ड/ माती सर्वेक्षणाचा नकाशा असणे गरजेचे आहे आणि शेतीखालील किमान 25% क्षेत्र हे ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंटखाली घ्यावे लागेल.

ICAR च्या आकस्मिक योजना आणि NICRA प्रकल्पाच्या यशस्वी निष्कर्षांवर आधारित शेतकी प्रणालींचा एकात्मिक प्रकल्पाच्या विकासासाठी विचार करता येईल.

याशिवाय धान्य साठा, बायोमास श्रेडर, चा-याचा साठा, गट विपणन यासारख्या सामायिक सुविधा/ स्त्रोत व मालमत्तेची निर्मिती आणि विकास यांस या घटकाच्या अंतर्गत प्रोत्साहन दिले जाईल.

शेतावरील पाणी व्यवस्थापन

OFWM, प्रामुख्याने ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरण्यावर भर देते आणि पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यावर लक्ष केंद्रित करते.

हे केवळ वापराच्या कार्यक्षमतेकडेच लक्ष न देता, RAD घटकाच्या सहयोगाने, पावसाच्या पाण्याचा प्रभावीरित्या साठा करणे आणि त्याचे व्यवस्थापन यास महत्व देते.

पाण्याचे संवर्धन, कार्यक्षम वितरण आणि वितरण प्रणाली तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी सहाय्य देण्यात येईल.

पाणी वापरणा-यांच्या संघटना इत्यादीं द्वारे सामायिक स्त्रोतांचे समान वाटप आणि व्यवस्थापन करण्यावर भर दिला जाईल.

शेतावरच पाण्याचे संवर्धन करण्यासाठी MGNREGA निधी आणि (MGNREGA अंतर्गत मनुष्यबळ वापरून खणणे शक्य नसल्यास) माती खणण्याची यंत्रसामुग्री वापरून शेत तळी खोदता येतील.

माती आरोग्य व्यवस्थापन

स्थान आणि पिकाशी निगडीत अवशेष व्यस्थापनासह, मातीच्या शाश्वत आरोग्य व्यवस्थापनाचा प्रसार करणे, मॅक्रो व मायक्रो पोषण व्यवस्थापनासह जमिनीच्या सुपीकतेचे नकाशे तयार करून व त्याचा वापर करून सेंद्रीय शेती पध्दतींचा प्रसार, जमिनीच्या क्षमतेनुसार तिचा उपयोग आणि खतांचा सुयोग्य वापर, जमिनीची धूप कमी करणे आणि ती निकृष्ट होण्यापासून वाचवणे हे SHM चे ध्येय आहे.

भौगोलिक सूचना प्रणालीद्वारे (GIS) आणि व्यापक क्षेत्रावरील वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून निर्मित सदर विषयाशी संबंधित नकाशे आणि जमीन तसेच मातीच्या वैशिष्ट्यांचा डेटाबेस वापरून मातीची वैशिष्ट्ये आणि जमिनीचा वापर यावर आधारित विविध सुधारित पध्दतींच्या पॅकेजेसना अनुसरून सहाय्य देता येईल.

याशिवाय ह्या घटकाचे सहाय्य मातीच्या समस्या (आम्ल / अल्कधर्मी / क्षारयुक्त) सोडवण्यासाठी करता येईल.

हा घटक राज्य सरकार, नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग (NCOF), सेंट्रल फर्टिलायझर क्वालिटी कंट्रोल अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युट (CFQC&TI) आणि सॉईल अँड लँड युज सर्व्हे ऑफ इंडिया (SLUSI) यांच्याकडून राबविण्यात येईल.

हवामानातील बदल आणि शाश्वत शेतीः देखरेख, प्रतिकृती आणि नेटवर्किंग (CCSAMMN)

स्थानिक शेतकी – हवामानासाठी योग्य शाश्वत व्यवस्थापन आणि एकात्मिक शेती प्रणालीसाठी CCSAMMN, हवामानातील बदलांसंबंधित माहितीची निर्मिती आणि तिचा दोन्ही दिशांनी (जमीनधारक/शेतकरी ते संशोधन /वैज्ञानिक संस्था आणि याउलट) प्रसार आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासंबंधी मार्गदर्शन/ हवामानातील बदलाची तीव्रता कमी करण्याबाबत संशोधन/क्लायमेट स्मार्ट नमुना प्रकल्पांची माहिती प्रदान करून तिचा प्रसार करेल.

पर्जन्य आधारित तंत्रज्ञान, नियोजन, एकत्रीकरण यांच्या प्रसारासाठी, कार्यात्मक तंत्र स्पष्ट करण्यासाठी आणि प्रमुख योजना/अभियानाबरोबर समन्वय करण्यासाठी (उदाहरणार्थ MGNREGS, IWMP, ऍक्सीलरेटेड इरीगेशन बेनिफिट प्रोग्रॅम (AIBP), RKVY, NFSM, NHM, NMAET इत्यादी) सर्वसमावेशक पथदर्शी ब्लॉक्ससाठी सहाय्य देण्यात येईल.

अशाप्रकारच्या इनपुट आणि आऊटपुट असलेल्या एकत्रित क्रियांमुळे शेती, पशुधन आणि यासारख्या इतर पर्जन्य आधारित उत्पादन पध्दतींची संभाव्य क्षमता वापरात आणू शकतील, ज्याद्वारे या स्थानिक उत्पादन प्रणालींना हवामान बदलामुळे येणारे धोके टाळून शाश्वतता देता येईल.

खर्चावर आधारित सहाय्य नमुना

खर्चावर आधारित सहाय्याचा संपूर्ण नमुन्यासाठी येथे क्लिक करा .

स्त्रोतः शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान, भारत सरकार

संबंधित स्त्रोत

शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान मार्गदर्शक सूचना (Operational Guidelines of National Mission for Sustainable Agriculture)

अंतिम सुधारित : 6/5/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate