অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतजमिनीच्या आरोग्यासाठी योजना मृद आरोग्य पत्रिकेची

शेतजमिनीच्या आरोग्यासाठी योजना मृद आरोग्य पत्रिकेची

आपल्याकडे होणारी शेती ही केवळ पारंपरिक पद्धतीने केली जाते. वर्षानुवर्षे आपली पिके घेण्याची पद्धत तीच कायम ठेवलेली आपणास दिसते, यात गेल्या काही वर्षांमध्ये जो काही बदल घडला तो फक्त आपल्याकडील शेतकरी नगदी पिकांकडे वळला इतकाच आहे. नगदी पिके घ्यायची असतील तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि किटकनाशके यांचा वापर केला जातो. याचा शेतातील जमिनीवर कालांतराने नकारात्मक परिणाम होवू शकतो. त्याचा थेट परिणाम आपणास शेतमालाच्या उत्पादनावर देखील दिसतो.

आपण आजारी असल्यास स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घेतो त्याच पद्धतीने वेळोवेळी शेतजमीन कशी आहे याची ही तपासणी करुन घ्यावी. या तपासणीतून जमिनीत असणारे वेगवेगळ्या धातूंचे प्रमाण कळणे शक्य होते. या वैज्ञानिक माहितीच्या आधारे आपण खतांचा वापर नेमका कसा करावा त्याचसोबत गरज असेल त्याठिकाणी पिके घेण्याच्या पद्धतीत बदल घेऊन उत्पन्न वाढवू शकतो. काही ठिकाणी आंतरपीक घेऊन देखील चांगल्या जमिनीतून अधिक उत्पन्न मिळवू शकतो.

शेतकऱ्याला आपल्या शेतातील जमीन कशा प्रकारची आहे. याची माहिती मिळावी याच हेतूने राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय  शाश्वत शेती अभियानाचा एक भाग म्हणून सन 2015 -2016 पासून मृद (जमीन ) आरोग्य पत्रिका योजना सुरु करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 1489272 हेक्टर आहे. जमिनीचा उतार 3% आहे. सन 2015-2016 पासून मृदा नमुने चाचणी करण्यात आली, त्यावरुन गडचिरोली जिल्ह्याची सुपीकता निर्देशांक व सुपीकता  पातळी तयार करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा नत्र, स्फुरद व पालाश या गुणधर्माचा सुपीकता निर्देशांक अनुक्रमे 1.37,1.10 व 2.59 आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या शिफारशीप्रमाणे नत्राची सुपीकता पातळी मध्यम असून स्फुरद गुणधर्माची सुपीकता पातळी कमी असून खताची मात्रा 25 टक्के वाढवून देण्यात आली व पालाश गुणधर्माची मात्रा भरपूर प्रमाणात आहे. त्याप्रमाणे पालाश खताची मात्रा 25 टक्के कमी करुन देण्याबाबत मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्यातील 83.47 टक्के आम्लधर्मी, 16.08 टक्के सर्वसाधारण व .045 टक्के आम्लधर्मी जमीन आहे. क्षारता सर्वसाधारण असून सर्व पिकाच्या योग्य वाढीस उपयुक्त आहे. सूक्ष्म मुलद्रव्यांमध्ये जस्त व लोहाची कमतरता आढळून आली. त्याकरिता झिंक सल्फेट 25 ते 30 किलो प्रती हेक्टरी जमिनीतून सर्वसाधारणपणे देण्यास सुचविले. या जिल्ह्यात मृदमाला 9 असून जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी आहे.

मृद आरोग्य पत्रिका योजना (प्रथम सायकल) उद्दिष्ट्यपूर्ती अहवाल

अ.क्र

बाब

लक्षांक

प्राप्त मृद नमूने

तपासणी करण्यात आलेले मृद नमूने

शेतकऱ्यांना वितरीत    जमिन आरोग्य पत्रिका

1

सन 2015-16

13659

13659

13659

46524

2

सन 2016-17

27318

27318

27318

79424

एकूण

40977

40977

40977

125948

 

मृद आरोग्य पत्रिका योजना (दितीय सायकल) उद्दिष्ट्यपूर्ती अहवाल

अ.क्र

बाब

लक्षांक

प्राप्त मृद नमूने

तपासणी करण्यात आलेले मृद नमूने

शेतकऱ्यांना वितरीत    जमिन आरोग्य पत्रिका

1

सन 2016-17

19744

27318

27318

79424

एकूण

40977

3548

1423


887

शेतीचा व्यवसाय लाभाचा व्यवसाय बनवायचा असेल तर त्यासाठी शेतीला यंत्रांसोबत वैज्ञानिक संशोधनाची जोड द्यावीच लागेल. शेतकऱ्याला शाश्वत स्वरुपात शेतीतून संपन्नता यावी यासाठी हे आवश्यक ठरते.

लेखक: प्रशांत दैठणकर

माहिती स्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate