आता सरकारी रुग्णालयासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट ऑनलाईन घेता येते. या सुविधेमुळे सरकारी हॉस्पिटलमधील सेवा अधिक सोयीस्कर होतील. शिवाय ओपीडीमध्ये डॉक्टरांना भेटणंही अधिक सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेमुळे घरातूनच एखाद्या डॉक्टरच्या भेटीची वेळ घेऊ शकता.
ऑनलाइन नोंदणी प्रणाली आधार क्रमांकाद्वारे देशातील विविध रुग्णालयांना जोडण्याचा एक प्रयत्न आहे.
कोणत्याही सरकारी रुग्णालयात ओपीडी मध्ये डॉक्टरांच्या भेटीची वेळ घेणे, लॅब रिपोर्ट मिळवणे आणि रक्त उपलब्धता पाहणे हे ऑनलाइन आणि सोपे झाले आहे.
या सुविधेचा उपयोग आणि लाभ कसा घ्यायचा याची माहिती देणारा हा माहितीपट आहे.
संदर्भ : ऑनलाईन नोंदणी प्रणाली (Online Registration System – ORS) , डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह, भारत सरकार
अंतिम सुधारित : 10/7/2020