महाराष्ट्रराज्याचीआर्थिकउन्नती, सामाजिक प्रगती व कल्याण साधण्यासाठी महाराष्ट्रात विज्ञान व तंत्रविद्या यांचे संवर्धन त्यांच्या उपयोजनेसह करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्थेची स्थापना डिसेंबर १९७५ मध्ये होमी नसेरवानजी सेठना यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असून तिचे मुख्य कार्यालय पुण्यास आहे.
संस्था स्वतः ठरविलेले अथवा महाराष्ट्र शासनाने सोपविलेले विविध प्रकारचे विज्ञान व तंत्रविद्याविषयक प्रकल्प हाती घेते अथवा तद्विषयक विशेष ज्ञान उपलब्ध करून शासनाशी सहकार्य करते. त्यामध्ये विज्ञान व तंत्रविद्या यांच्या विषयीच्या योजना व समन्वय, शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठातील व तांत्रिक संस्थांतील शिक्षणात सुधारणा व त्यांचे आधुनिकीकरण; नैसर्गिक साधनसंपत्तीचे समन्वेषण, संरक्षण व विनियोग; परिसर आणि सामाजिक व आर्थिक परिस्थिती यांच्याशी सुसंवादी असा शेती व उद्योगधंद्यांचा विकास, ग्रामीण जीवनाशी संबंधित प्रश्न, उद्योगधंद्यातील तांत्रिक समस्या इत्यादींचा समावेश होतो.
विज्ञान व तंत्रवैज्ञानिक विषयांसंबंधी सुजाण लोकमत तयार करणे; सामाजिक, आर्थिक व भौगोलिक परिस्थितीला अनुरूप समुचित तंत्रे विकसित करण्यास प्रोत्साहन देणे; विज्ञान व तंत्रविद्याविषयक माहितीचा सामान्य जमतेत प्रसार करण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील संस्थांशी सहकार्य करणे आणि परिसरविषयक समस्या आणि उद्योगधंद्यांतील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी संस्थेजवळ असलेले विशेषज्ञान शासनास पुरविण्याचे कार्य ही संस्था करते.
संशोधनात्मक लेख, अहवाल व ग्रंथ यांचे प्रकाशन करणे, व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित करणे, विज्ञान व तंत्रविद्या यांच्या संवर्धनार्थ आर्थिक सहाय्य मिळविणे व त्याचा विनियोग करणे यांचाही समावेश संस्थेचा कार्यक्षेत्रात होतो.
महाराष्ट्र शासनाने, १०+२+३ या शैक्षणिक आकृतिबंधाची पाहणी करण्याचे काम संस्थेने नेमलेल्या शैक्षणिक मंडळाकडे सोपविले होते. ते पूर्ण करून मंडळाने आपला अहवाल १९७५-७६ मध्ये शासनास सादर केला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भूमिजल संपत्तीचे मूल्यमापन करण्यासंबंधीच्या शिफारसींचा प्राथमिक अहवाल संस्थेने १९७७ मध्ये शासनाकडे पाठविला.
संस्थेने महाराष्ट्रातील उच्चतर शिक्षण व विद्यापीठ कायदा यांवल सखोल अभ्यास करून उच्च शिक्षणात कोणत्या प्रकारचे बदल केले पाहिजेत व अशा प्रकारचे बदल करण्यासाठी विद्यापीठात शैक्षणिक तसेच प्रशासकीय विकेंद्रीकरण कसे केले पाहिजे, यावर एक प्रदीर्घ अहवाल महाराष्ट्र शासनास सादर केला आहे. या अहवालाचा विद्यापीठ कायद्यात नवीन बदल करण्यासाठी उपयोग होणार आहे. तसेच सामाजिक वनीकरण, प्रदूषण आणि पर्यावरण यांबाबतीतही आपले अहवाल व शिफारशी शासनाकडे पाठवल्या आहेत केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रविद्या मंडळाकरिता संस्थेने राज्य पातळीवरील सायन्स ॲकॅडेमीआणित्यांचेकार्ययांवर१९८४मध्येएकपरिसंवादआयोजितकेलाहोता. यापरिसंवादातीलशिफारशीकेंद्रसरकारच्यापूर्ततेसाठीपाठविण्यातआल्याआहेत.
पुढील काळात कृषी, रसायनशास्त्र, गणित, जीवविज्ञान, वैद्यक, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी यांविषयी संशोधन हाती घेण्याचा संस्थेचा विचार आहे.
संस्थेच्या सदस्यत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) संस्था सदस्य, (२) आश्रयदाते, (३) प्रतिवार्षिक, (४) संघसदस्य, (५) दाते व (६) सहसदस्य.
लेखक : गो. रा.केळकर
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/25/2020