उद्योजक
रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजनांचा फायदा घेण्यासाठी उद्योजकाने स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे.
उद्योजकांकरिता सुविधा
- उद्योजकांना नोंदणी व नोंदणीचे अद्यावतीकरण ऑनलाईन करण्याची सुविधा.
- उद्योजकांना कायम/तात्पुरत्या भरतीसाठी,रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम,रोजगार मेळावे इ.पदे अधिसूचित करण्याची ऑनलाईन सुविधा.
- रिक्तपदांची जाहिरात ऑनलाईन करण्याची सुविधा.
- 25 लाख व त्यापॆक्षा जास्त नोकरीउत्सुक उमेदवारांची, त्यांच्या विविध शैक्षणिक पात्रता व कौशल्ये यानुसार माहिती पाहण्याची ऑनलाईन सुविधा.
- उमेदवारांच्या विविध शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव, वास्तव्याचे ठिकाण इ. नुसार आवश्यक मनुष्यबळ शोधण्याकरिता ऑनलाईन सुविधा.
- सेवायोजन कार्यालये रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा 1959 नुसार से.वि-१ व से.वि.२ ऑनलाईन सादर करण्याची सुविधा.
- नोकरीस लागलेल्या उमेदवारांची माहिती ऑनलाईन सादर करण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्याचे स्थळ, वेळ दर्शविणारा तक्ता पाहण्याची व रिक्तपदे अधिसूचित करण्याची ऑनलाईन सुविधा.
- उद्योजकांना नोकरीस लागलेल्या उमेदवारांची भरतीबाबतची माहिती, से.वि.-1, से.वि.-2 कालमर्यादेत सादर करण्याकरिता तसेच रोजगार मेळाव्यांबाबतचे स्थळ व वेळापत्रक इ. बाबतची माहिती SMS व E-mail व्दारे मिळण्याची सुविधा.
या सुविधांचा लाभ घेण्याकरिता आजच नोंदणी करा अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्यास Log In करा.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट
अंतिम सुधारित : 7/11/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.