कामगार कट्टा
कामगार कट्टा हॆ असे एक विनामूल्य इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ की जे, असंघटीत क्षेत्रातील कुशल,अर्धकुशल व अकुशल कामगार देत असलेल्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे व नागरिकांनी अशा कामगारांशी संपर्क साधण्यासाठीचे उत्तम माध्यम होय.
सेवा देणा-यांकरिता उपलब्ध सुविधा :-
- सेवा देणा-यांसाठी त्यांच्या सेवांविषयक व इतर वैयक्तिक माहिती ऑनलाईन नोंदविण्याची सुविधा.
- सेवा घेणा-यांची मागणी आणि त्यांच्या संपर्काबाबतची माहिती ऑनलाईन मिळण्याची सुविधा.
- ज्यांना सेवेची आवश्यकता आहे, अशा नागरिकांची संपर्क माहिती SMS व E-mail व्दारे मिळण्याची सुविधा.
सूचना :-
- सेवा देणा-यांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण नोंदणीस 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील 1 महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे. हे नुतनीकरण या वेबपोर्टलव्दारे, भ्रमणध्वनी, किऑस्क अथवा हॅण्डहेल्ड डिव्हाईसव्दारेही आपण करु शकता. नुतनीकरण करण्याकरिता येथे क्लिक करा.
या सुविधांचा लाभ घेण्याकरिता आजच नोंदणी करा. अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्यास Log In करा.
सेवा घेणा-यांकरिता उपलब्ध सुविधा :-
- आवश्यक असणा-या सेवांबाबतची माहिती व इतर वैयक्तिक माहिती ऑनलाईन नोंदविण्याची सुविधा.
- विविध प्रकारचे कौशल्य असलेल्या कुशल, अर्धकुशल व अकुशल उदा. नळ कारागीर, तारतंत्री, वाहनचालक, सुश्रृषा सेवा देणारे, वीजतंत्री, घरकाम सेवा देणारे, मजूर इ. सेवा देणा-यांच्या उपलब्ध असलेल्या डाटाबेसमधून ऑनलाईन शोध घेण्याची सुविधा.
- उत्तम सेवा मिळण्यासाठी सेवा देणा-यांचे कौशल्य, अनुभव, ठिकाण तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार विविधप्रकारे शोध घेण्याची ऑनलाईन सुविधा.
- मागणी केलेल्या सेवेसंदर्भात, सेवा देणा-यांची संपर्क माहिती स्वयंचलित SMS व E-mail व्दारे मिळण्याची सुविधा.
- सेवा देणा-यांच्या सेवेच्या गुणवत्तेबाबत प्रतवारी ऑनलाईन नोंदविण्याची व वेबपोर्टलवर प्रदर्शित करण्याची सुविधा असल्यामुळे, गुणवत्तापूर्ण काम व सेवा मिळणे शक्य आहे.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट
अंतिम सुधारित : 6/25/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.