योजना - रोजगार मेळावे
या योजनेमध्ये उद्योजक व नोकरीउत्सुक उमेदवार यांना एका छताखाली एकत्र आणून उद्योजकांना आवश्यक असलेले मनुष्यबळ विनामूल्य उपलब्ध करुन देणे व नोकरीउत्सुक उमेदवारांना नोकरीसाठी सहाय्य करण्याकरिता रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत विशेष प्रयत्न केले जातात.
रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे.
नोकरीउत्सुक उमेदवारांकरिता सुविधा
- रोजगार मेळाव्याचे ठिकाण व वेळापत्रक ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध रिक्तपदांची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यासंबंधीची माहिती SMS Alert व E-mail व्दारे मिळण्याची सुविधा
या सुविधांचा लाभ घेण्याकरिता आजच नोंदणी करा अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्यास लॉग इन करा.
उद्योजकांकरिता सुविधा
- रोजगार मेळाव्यासाठीची रिक्तपदे ऑनलाईन नोंदविण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्याचे ठिकाण व वेळापत्रक ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यासंबंधीची माहिती SMS Alert व E-mail व्दारे मिळण्याची सुविधा.
- रोजगार मेळाव्यासंबंधीची सांख्यिकी माहिती ऑनलाईन सादर करण्याची सुविधा.
या सुविधांचा लाभ घेण्याकरिता आजच नोंदणी करा अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्यास लॉग इन करा.
रोजगार मेळावे कार्यक्रम या योजनेची ठळक वैशिष्ठये
- उद्योजक व नोकरीउत्सुक उमेदवार यांच्यासाठी असलेल्या या योजनेची सुरुवात 29th जून, 2007 रोजी सुरु करण्यात आली.
- महाराष्ट्रामधील कोणत्याही रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंदणी केलेल्या नोकरीउत्सुक उमेदवारास व नोंदणीकृत उद्योजकांना रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेता येतो.
- रोजगार मेळाव्यामध्ये उद्योजकांना त्याच ठिकाणी तात्काळ आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होते तसेच नोकरीउत्सुक उमेदवारांना जागेवरच नोकरी मिळू शकते.
- रोजगार मेळावे ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट