भारत सरकारने सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी शपथ घेतलेली आहे; पण, आशिया खंडात भारतात अजूनही मुलींच्या शिक्षणाचा आकडा सर्वात कमी दिसतो. १९९१ च्या जनगणनेनुसार, ७ वर्षांवरील मुली आणि महिलांची संख्या ३३ कोटी होती. त्यापैकी ४० टक्क्यांपेक्षा कमी शिक्षित होत्या. त्यावरुन असे लक्षात येते की २० कोटी महिला अशिक्षीत होत्या.
ह्या अशिक्षिततेमुळे मुलीच्या जीवनावर फार वाईट परिणाम होतो, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर व देशाच्या उन्नतीवर त्याचा फार मोठा परिणाम होतो. वेगवेगळ्या अभ्यासावरुन असे लक्षात आले आहे की अशिक्षीत महीलांमध्ये बाळंतपणात मरणा-यांची संख्या जास्त आहे. याशिवाय आहाराची कमतरता, कमी मिळकतीची ताकद आणि घर चालवण्याची कमी हुशारी याही समस्या आहेतच. मुलीच्या अशिक्षीत राहण्याने तिच्या मुलांच्या आरोग्यावर व पालनपोषणावरही परिणाम होतात. गेल्या काही काळातील परिक्षणावरुन असे लक्षात आले की भारतात गर्भपाताचा संबंध आईच्या अशिक्षीत असण्यावरही आहे. तसेच, अशिक्षीतांच्या संख्येमुळेही भारताच्या विकासावर परिणाम होतो.
भारतात मुलींच्या व महिलांच्या शिक्षणावर भर दिला गेलेला आहे. आगामी काळात भारताने पूर्वीपेक्षा शैक्षणिक कार्यक्रमात वाढ केलेली आहे. खास करुन मुलींना प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
अंतिम सुधारित : 6/5/2020