অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चित्तोडगढ

चित्तोडगढ

चित्तोडगढ

राजपुतांची वीरभूमी म्हणून ओळखला जाणार राजस्थानाच्या मेवाड भागातील प्रसिद्ध गड. दुसरा पांडव भीम याने हा दुर्ग प्रथम बांधला, अशी आख्यायिका आहे. गडावर भीमलत्ताकुंड नावाचे ठिकाण आहे. तेथे भिमाने लाथ मारून पाताळातील पाणी आणले, अशी दंतकथा आहे. इतिहासकाळात हा किल्ला कोणी आणि केव्हा बांधलायाची निश्चित माहिती नाही. याचे जुने नाव चित्रकोट. हे सातव्या शतकातील मोरी राजपूत राजा चित्रांगद याच्यावरून पडले आणि त्यावरूनच चित्तोड हे नाव पडले असावे. चित्रांगदाच्या राजवाड्याचे व तलावाचे अवशेष गडावर दक्षिण भागात आहेत. बाप्पा रावळ याने ७३४ मध्ये हा गड घेतला. महाराणा जैत्रसिंगाने येथे राजधानी आणली. अलाउद्दीन खल्‌जीने १३०३ मध्येगुजरातच्या बहादुरशाह याने १५३४ मध्ये व अकबराने १५६७ मध्ये हा गड जिंकून घेतला. १३०३ मध्ये रतनसिंग रावळ याची सौंदर्यवती पत्नी पद्मिनी हिने अनेक राजपूत स्त्रियांसह१५३४ मध्ये महाराणा संग्रामसिंह याची पत्नी कर्मवती हिने त्याचप्रमाणे १५६७ मध्ये महाराणा प्रतापसिंहाच्या वेळीही अनेक राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या शीलाचे रक्षण केले. ती ठिकाणे गडावर पहावयास मिळतात.

श्चिम रेल्वेच्या उदयपूर-चित्तोडगढ व रतलाम-अजमीर फाट्यांवरील प्रस्थानक चित्तोडगढपासून पूर्वेस गंभीरी नदीपलीकडे सु.३ किमी. वर चितोड या गावी आहे. त्याच्या पूर्वेस सु. ५ किमी. वर थेट दक्षिणोत्तर गेलेल्या सु. ५ किमी. लांबीच्या,०.८ किमी. रूंदीच्यामाथ्यावर सु. २०० हे. क्षेत्रफळ असलेल्या व सु. १५२ मी. उंचीच्या टेकडीवर हा किल्ला आहे. चित्तोड गावाकडून रामपोळ मार्गाने सात दरवाजे ओलांडून वरपर्यंत चांगला रस्ता आहे. वाटेत सेनापती जयमल्लफत्ता आणि कल्ला यांच्या छत्र्या लागतात. गडावर जाण्यास पूर्वेकडून सूरजपोळ व उत्तरेकडून लाखोटा बारी असे अन्य मार्ग आहेत.

बाराव्या शतकातील महाजन जिजा याने तीर्थंकर आदिनाथाचा म्हणून बांधलेला २४.४ मी. उंचीचा किर्तिस्तंभ जैन वास्तुकलेचा नमुना होय. पंधराव्या शतकात राणा कुंभ याने माळवा आणि गुजरात येथील सुलतानांच्या सैन्यांवर एकाचवेळी मिळविलेल्या विजयानिमित्त उभारलेला ३६.६ मी. उंचीचा नऊ मजली विजयस्तंभ हा हिंदूंच्या पुराणकथा व देवदेवता यांचे शिल्प नावांसह जतन करून ठेवणारा म्हणून प्रेक्षणीय आहे. यांशिवाय पद्मिनीमहाल, मीराबाईचे मंदिर, मुळचे सूर्यमंदिर परंतु आताचे कालिकामंदिर, समिद्धेश्वर, सिंगारचौरी इ. गडावरील ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

दातार, नीला

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate