অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांस्कृतिक भारत : जम्मू आणि काश्मीर (उत्तरार्ध)

सांस्कृतिक भारत : जम्मू आणि काश्मीर (उत्तरार्ध)

जम्मू आणि लडाखला सुद्धा स्वत:चे असे सांस्कृतिक स्थान आहे. दुम्हाल हे काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध नृत्य आहे. हे नृत्य पुरूषांकडून केले जाते. महिला रूफ नावाचे दुसरे पारंपरिक लोकनृत्य सादर करतात. कुड नावाचेही एक लोकप्रिय लोकनृत्य आहे. हे नृत्य लोकदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाते. हे नृत्य एक विधी म्हणून केले जाते आणि ते फक्‍त रात्री सादर केले जाते. बाछा नगमा नृत्य हे लग्न समारंभात केले जाते. शक्यतो हे नृत्य तरूणांकडून सादर केले जाते. या नृत्यात सहा किंवा सात तरूण असतात आणि त्यात एक गाणारा प्रमुख नेतृत्व करत असतो. याशिवाय दनदारा नृत्य, लाडीशहा नृत्य आदी नृत्य प्रकारही काश्मीरात प्रसिद्ध आहेत.

सुफियाना कलाम हे अभिजात संगीत काश्मीरचे समजले जाते. या संगीताचा स्वत:चा असा राग आहे, ज्याचे नाव माकम असे आहे. संतूर वाद्यावर हे संगीत निर्माण केले जाते. या वाद्यासोबत साज, सतार, वासोल आणि डोकरा ही वाद्यही वाजवली जातात.

हस्तव्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय. राज्यातील रोजगारांमध्ये सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणून पारंपरिक व्यवसाय आहे. हस्तव्यवसायाला प्राधान्य. तसेच देशात आणि परदेशात या हस्त व्यवसायातील उत्पादनांना मोठी मागणी असते. या उत्पादनामध्ये पेपर- मशीन, लाकडी साधने, गालीचा, शाल, नक्षीकाम व इतर साधनांचा समावेश आहे. या उद्योगांतून प्रामुख्याने गालीचाच्या उद्योगातून भरमसाठी विदेशी चलनांची प्राप्ती होते.

सुमारे 80 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. धान, गहू व मका प्रमुख पिके घेतली जातात. बार्ली, बाजरा व ज्वारीही पिकेही काही भागात घेतली जातात. लडाखमध्ये हरभरा पिकतो.

रामाचा रावणावरील विजय- विजयादशमी– अस्सूज म्हणून साजरा केला जातो. शिवरात्रीचे आयोजन राज्यात मोठ्या प्रमाणात होते. ईद-उल-फित्र, ईद-उल-झुला, ईद-मिलाद-उल-नबी आणि मेहराज आलम हे प्रमुख मुस्लीम सण, मोहरम देखील महत्त्वाचा. जूनमध्ये साजरा होणारा लडाख मधील हेमिस गुंपा हा सण विश्वविख्यात आहे. त्यातील मुखवट्यांचे नृत्य हे त्याचे वैशिष्ट्य. जानेवारीतील वार्षिक सणात कालिमातेच्या प्रचंड मूर्ती लेहमधील स्पिटुक मठात प्रदर्शित केल्या जातात. हिवाळ्यात साजरा केला जाणारा ‘लोहरी’ रामबाग व सभोवतालच्या खेड्यात साजरा केला जाणारा सिंहसंक्रांती भडेरवा व किस्तवार येथे चैत्रात साजरा केला जाणारा ‘मेला पाट’ हे लोकप्रिय उत्सव आहेत. लोहरी म्हणजेच मकर संक्रांत, बैसाखी, हेमीस, दसरा, दिवाली, बाहु मेला, उरूस, आदी सण काश्मीरात साजरे केले जातात.

जम्मू व काश्मीर मध्ये उर्दू, काश्मीरी, डोग्रा, डोगरी, हिंदी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी, दादरी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जात असल्या तरी अजून काही लोकभाषा राज्यात बोलल्या जातात, त्या खालीलप्रमाणे:

भाषा व ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे - बाल्टी – बाल्टी, चाँग्पा - चाँग्पा /चाम्पा, द्रोस्खत, (दोक्पा) - दोख्पा/ द्रोक्पा, गु्ज्जरी – बाकरवाल, लदाखी - बेडा, बोध, गारा, मोन, परीमु – गुज्जर, शिना - ब्रोक-पा.

या व्यतिरिक्‍त बाकरवाल, बेडा, बोट, बोटो, ब्रोकपा, द्रोकपा, दर्द, गड्डी, गारा, मोन, पुरीगपा, सीप्पी आदी आदिवासीही काश्मीरात निवास करतात.

अखनूर, अचबल, अथवट्टू, अनंतनाग, अमरनाथ, अवंतीपूर, अलची गोम्पा, कारगिल, किश्तवार, कुड, कोकरनाग, खजियार ग्लेशियर, गुलमर्ग, जम्मू, तरसर व मरसर सरोवर, दाचीगाम अस्वले, नहलगाम थंड हवेचे ठिकाण, पूरमंडल, बाटोट, मनसर सरोवर, लायामारू बौद्ध मठ, लेह, वुलर सरोवर, वेरीनाग सरोवर, वैष्णोदेवी, सरसर, सियाचीन ग्ले‍सीयर, सोनमर्ग, श्रीनगर, हरवर, हेमीस उद्यान, डल सरोवर, लडाख, शालीमार बाग, निशात बाग, नुबरा खोरे, बेताब खोरे, बहु किल्ला, लोहचुंबक टेकड्या आदी पर्यटन केंद्रे महत्त्वाची आहेत.

काश्मीर राज्यात काराकोरम, कार, लडाख, पीरपांजाल, धौलाधार, शिवालिक हे पर्वत असून सिंधू, श्योक, झेलम, चिनाब, रावी, रिहन्द ब्रिनघी, चिपच्याप, दोडा, द्रास, गालवन, इंदूस, लिद्दर, मारखा, नाला पालखू, निलूम, नुब्रा, पुंछ, रांबी, संद्राम, शिंगो, सिंद, सुरू, तावी, तसराप, उझ, वेशाव या नद्या राज्यातून वाहतात.

लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate