बिहार राज्याच्या भागलपूर चिल्ह्यातील गंगेच्या काठी असलेला एक डोंगर. पत्थर घाट पूर्व लोहमार्गावरील कोलाँग स्थानकाच्या ईशान्येस १०किमी. वर आहे. सध्या हा ‘बटेश्रर स्थान’ या नावाने ओळखला जातो.
सु. शतकापूर्वी तो ‘सिलासंगम’ या नावाने ओळखला जाई. डोंगराच्या उत्तर बाजूस सातव्या-आठव्या शतकांपूर्वीची कोरीव लेणी आहेत. यांपैकी ८४ स्वामींच्या मूर्ती पाहण्यासारख्या आहेत.
डोंगरातील पाच गुहांपैकी बटेश्वर नावाच्या गुहेत ब्राँझचे व चांदीचे काही अवशेष सापडले आहेत. पश्चिमेकडील अर्ध्या भागात काही लेणी असून त्यांना ‘गुहास्थानम्’ असे म्हणतात. यांपकी काहींना दगडी दरवाजे आहेत. येथे सापडलेले अवशेष गुप्तकालीन आहेत.
पवार, चं, ता.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/22/2020