आग्नेय ओरिसामधील नदी. लांबी सु. १५० किमी. बौध-खोंडमाल्स जिल्ह्यातील पूर्व घाटांपैकी एका डोंगरा-मध्ये सोरंद शहराच्या ४० किमी. पश्चिमेस ही उगम पावते. गंजाम जिल्ह्यातून वहात ही चिल्का सरोवराच्या दक्षिणेकडे आणि गंजाम शहराच्या पूर्वेस बंगालच्या उपसागराला मिळते. हिला अस्क शहराजवळ उत्तरेकडून तिची एक छोटी उपनदी महानदी व हिंजीली शहराजवळ दक्षिणेकडून घोडहद या नद्या मिळतात. ऋषिकूल्य नदीवर कालवे काढून सु. ६६,००० हे. जमीन पाण्याखाली आणली असल्याने हिला ओरिसात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
लेखक : र.रू.शाह
स्त्रोत :मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/10/2020
कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते.
मोठ्या भूप्रदेशावरून वाहत जाणारा निसर्गोत्पन्न जलप...
दुष्काळी भागातील शेती शाश्वत व किफायतशीर करावयाची...
गोमल. सिंधूची एक उपनदी. लांबी सु. २४० किमी.