অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निसर्गाची अद्भूत देण... मेळघाटातील चिखलदरा

मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे मध्य भारतातील सातपुडा पर्वतरांगामधील दक्षिणेकडील शिखावर स्थित आहे. त्याला गाविलगढ असे संबोधले जाते. वैराट येथे सर्वोच्च बिंदू (इ.स. ११७८ मीटर, समुद्रसपाटीपासून वरील) बाजुस पूर्व - पश्चिम कार्यरत उच्च रिज आहे. ती रिझर्व्ह सीमारेषा तयार करते. तो वाघाचा एक अविभाज्य आवास आहे. येथील वन हे ‘टेक्टोजना ग्रॅनडीज’ (सागवानील लाकुड) द्वारे राखले गेलेले उष्णदेशीय कोरडा नियमितपणे पाने गळणारा आहे.

रिझर्व्ह पाच प्रमुख नद्यांचा एक पाणलोट क्षेत्र आहे. खंडू, खापरा, सिपना, गडगा आणि डोलार ह्या सर्व नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. रिझर्व्ह उत्तर सीमा क्षेत्र हे तापी नदीद्वारे दर्शविले जाते. मेळघाट हे राज्याचे मुख्य जैव विविधतेचे भांडार आहे. मेळघाटाचा उतार हा पूर्णा नदीचा पाणलोट भाग तयार करतो. मेळघाट प्रदेश मधून तीन प्रमुख उपनद्या चंद्रभागा, अदनानी आणि वान ह्या पूर्णा नदीतून वाहतात.

चिखलदरा हे समुद्रसपाटीपासून ११०० मीटर (3634 फूट) उंची वर स्थित एक पठार आहे. मेळघाटाला निसर्गाने काही नोंद गुणांसह एक खडबडीत भौगोलिक परिस्थितीच्या स्वरूपात संरक्षण देऊ केली आहे. माखला (Makhala), चिखलदरा, चिलदरी (Chiladari), पाटुला (Patulda) आणि गूगामल (Gugamal) खडकाळ प्रदेश मोठ्या प्रमाणात आहेत. सातपुडा पर्वतरांगांमधील जंगल सान्निध्य क्षेत्र हे दीर्घकालीन संवर्धन क्षमतेची हमी देते.

संवर्धन इतिहास

मेळघाट परिसर हा १९७४ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते. सद्यस्थितीत एकूण क्षेत्र सुमारे १६७७ चौ.किमी आहे. रिझर्व्ह क्षेत्रापैकी ३६१.२८ चौ किमी जागा ही गूगामल (Gugamal) राष्ट्रीय उद्यान कोर क्षेत्राकरिता तसेच ७८८.२८ चौ.किमी क्षेत्र रिझर्व्ह, मेळघाट वाघ अभयारण्य क्षेत्र बफर असे एकत्र मेळघाट अभयारण्य म्हणून १९९४ मध्ये राज्य सरकारद्वारे पुन्हा सूचित करण्यात आले होते. (कि ज्यापैकी २१.३९ चौ.किमी. जागा हि वनमध्ये येत नाही). उर्वरित क्षेत्र एक 'अनेक वापर क्षेत्र' म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे.

पूर्वी, मेळघाट वाघ अभयारण्य १५९७.२३ चौ.किमी एक क्षेत्र १९८५ मध्ये स्थापन करण्यात आला. त्यानंतर गुगामल (Gugamal) राष्ट्रीय उद्यान १९८७ मध्ये या अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. पुरातत्व विभागाकडून चिखलदरा पठारावर गाविलगढ किल्ला आणि नरनाळा किल्ला हे क्षेत्र सौंदर्याचे मूल्य जोडून मेळघाट व्याघ्र दक्षिण भाग गरज नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, या पुरातत्व वास्तूचा अभ्यागतांनी पार्श्वभूमीवर प्रसन्न वन आनंद घेतात.

चिखलदरा

जैवविविधतेने संपन्न असलेल्या मेळघाटचा पूर्व वनप्रदेश म्हणजे चिखलदरा. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 3664 फुट उंचीवर आहे. विदर्भाचं नंदनवन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहे. गर्द वनराईतील ‘चिखलदरा’ भटकतांना येथील हिरवीगर्द वनराई आपल्याला पावलोपावली आपल्या मोहात पाडते. येथील निसर्गसृष्टीचं अवलोकन करतांना सातपुड्यातील उंच अशा दऱ्याखोऱ्यातून वावरतांना कधी-कधी जंगलाचा राजा वाघाचे तर कधी अस्वलाचे हमखास दर्शन होते. मात्र या सर्वांवर मात करतं ते येथील आल्हाददायक, मनमोहक निसर्ग सौंदय. त्यामुळेच येथे पर्यटकांची नेहमीच जथ्थे पहायला मिळतील.

अमरावती शहरापासून पन्नास किलोमीटरवर परतवाडा (तालुका अचलपूर) या तालुका स्थळापासून 55 किमी अंतरावर चिखलदरा. परतवाड्यावरुन चिखलदऱ्याला जातांना दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा दृष्टीस पडतात. निसर्गाची विविध रुपे पर्यटकांचे मन मोहून टाकतात. घाटमेळ्याचा प्रवास सुरु झाला की गार वाऱ्‍याच्या झुळूका आल्हाददायक वाटू लागतात. नागमोडी वळणे, खोल-खोल दऱ्‍या आनंद घेत असतांना नानाविध रानपाखरांची आवाज ऐकू येतो. वृक्षलता पर्वतराजीवर लडिवाळपणे पहुडल्या असल्याचे दिसतात. तो एक सुखद अनुभव देतो.

पुढे मग विदर्भाचे नंदनवन असलेल्या थंड हवेच्या चिखलदऱ्याचे मनोहारी दर्शन होऊ लागते. मोरपिसाऱ्यासारखी सिल्व्हर ओकची झाडं मोहात पाडतात. वसंत ऋतूत आम्रवृक्षांच्या दुधाळ मोहराचा सुगंध दरवळत राहतो. याचवेळी मोहाची झाडंही दुधाळ आणि रसाळ फुलांनी लदबदली असतात. ऐतिहासिक संदर्भ असलेल्या भीमकुंड, आवाजाचे पाच प्रतिध्वनी ऐकू येणारा पंचबोल, देवी पॉईंट, मोझरी पाईंट आणि जवळपास आठ नऊशे वर्षाचा इतिहास असलेला अबोल असा उपेक्षित ‘गाविलगड’ किल्ला आपल्याला साद घालतो. येथील सृष्टीचं मनोहारी रुप पर्यटकांना वेड लावते. कधी-कधी चिखलदऱ्‍याच्या रस्त्यावर वाघ, अस्वलाचेही दर्शन होते. चिखलदऱ्‍याच्या दोन्ही दिशांनी वृक्षलतारुपी हिरवा शालू कमी अधिक प्रमाणात बाराही महिने पांघरलेला दिसतो. थंड आणि शुद्ध हवा यातून मनाला उभारी मिळते. येथील निसर्गजीवनाचा स्पर्श भटकंतीस आलेल्या पर्यटकास ऊर्जा देतो.
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये उदयास आले. १८०३ मध्ये इंग्रजांनी गाविलगड किल्ला जिंकल्यावर तेथील लोक किल्ल्याच्या बाहेरील पहाडावर येऊन राहू लागले. हीच चिखलदऱ्‍याची पहिली वस्ती होय.

चिखलदऱ्यातील मनोहारी पॉईंन्ट

एका आवाजाचे पाच प्रतिध्वनी ऐकू येणारा पंचबोल - इको पॉईंट, मंकी पाँईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, लाँग पॉईंट, प्रॉस्पेट पॉईंट, बेलेन्टाईन पॉईंट, लेन पॉईंट, हरिकेन पॉईंट ही बहुतेक नावे ब्रिटीश अधिकाऱ्‍यांचीच आहेत. पावसाळ्यात ‘भिमकुंड’ पाहणाऱ्या पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. जवळसपास हजार वर्षाचा इतिहास असलेला ‘गाविलगड’ किल्ला पाहणाऱ्‍या पर्यटकांना गत इतिहासात घेऊन जातो. चला तर मग एकदा तरी जाऊ या निर्सगाच्या कुशीत चिखदऱ्याला…

कसे पोहचाल

जवळचे विमानतळ- नागपूरपासून 4 तासांच्या अंतरावर
जवळेचे रेल्वे स्टेशन- बडनेरा, अमरावती
बससेवा – अमरावती- चिखलदरा (100 किमी अंतरावर)
नागपूर- चिखलदरा 230 कि.मी. एसटी व खासगी बसेस उपलबध
मुंबई- चिखलदरा 800 किमी अंतरावर

राहण्याची सोय

एमटीडीसी रेसॉर्ट, शासकीय विश्रामगृह, वनविभागाचे विश्रामगृह याशिवाय मोठ्या प्रमाणात खासगी हॉटेल्स सर्व दरात उपलब्ध.

विश्रामगृह आरक्षणाकरिता उपवनसंरक्षक चिखलदरा यांचा दूरध्वनी क्र. 07220230229,
सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा दूरध्वनी क्र. 07223220260 तर
एमटीडीसी, अमरावती कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0721/2661601/2661611 असा आहे.

आकर्षित पर्यटन स्थळे

भिमकुंड (किचकदरी) , वैराट देवी , सुर्यास्त पॉईंट (सनसेट पॉईंट), पंचबोल पॉईंट
हरिकेन पॉईंट , महादेव मंदिर, देवि पॉईंट, गाविलगढ किल्‍ला, मोझरी पॉईंट, पंचधारा धबधबे


लेखक - विजय राऊत,
माहिती सहायक
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate