অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंडियानापोलिस

इंडियानापोलिस

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इंडियाना राज्याची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ७,४४,६२४ (१९७०). हे व्हाइट नदीकाठी असून शिकागोच्या आग्नेयीस २८२ किमी. आहे. व्यापार, उद्योग, दळणवळण व शिक्षण यांचे हे केंद्र समजले जाते. येथे रेल्वे वर्कशॉप, पिठाच्या गिरण्या तसेच होजिअरी, छपाई, औषधे, विजेची उपकरणे, विमानांचे भाग, मोटारींचे सांगाडे व सुटे भाग, तयार कपडे, अन्नपदार्थ, धातूंच्या वस्तू इत्यादींचे अनेक लहानमोठे कारखाने असून बटलर विद्यापीठ, इंडियाना विद्यापीठ, महाविद्यालये, विविध शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. अमेरिकन कवी रायली याचे हे जन्मस्थान व अमेरिकेचा अध्यक्ष बेंझामिन हॅरिसन याची ही कार्यभूमी होय.

लेखक : र. रू. शाह

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate