ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यातील ब्रेमेर नदीवरील शहर. लोकसंख्या ५४,५०० (१९६६). हे ब्रिस्बेनच्या पश्चिमेस ३८ किमी. असून शेती, खाणकाम व अवजड यंत्रोत्पादन ह्यांचे मोठे केंद्र आहे. कोळसा-उद्योगात सु. दोन हजार कामगार असून वार्षिक उत्पादन पंधरा लक्ष टन आहे. येथील रेल्वे यंत्रशाळा मोठी आहे. लोकर, लाकूड, धातू ओतकाम, लोणी, हार्डबोर्ड इ. उद्योग शहरात चालतात. येथे पहिली वसाहत १८२९ मध्ये स्थापन झाली.
लेखक : वि. रा. गद्रे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/3/2020
कोकोस (कीलिंग) बेटे : ऑस्ट्रेलियाची हिंदी महासागरा...
पूर्व इंग्लंडच्या सफक परगण्यातील शहर. लोकसंख्या १...
थायलंडमध्ये पर्यटन उद्योग हा महत्त्वाचा आर्थिक उत्...
मरी नदी : ऑस्ट्रेलियाची २, ५८९ किमी. लांबीची प्रमु...