वायव्य चीनमधील शिंजिआंग (सिक्यांग) या स्वायत्त प्रांताची राजधानी. लोकसंख्या ५,००,००० (१९७० अंदाज). १९५४ पर्यंत शहराला डीहवा म्हणत; चिनी भाषेत याला वूलूमूची म्हणतात. रशियातून व भारतातून येणाऱ्या व्यापारी मार्गावरील हे पूर्वीपासूनचे महत्त्वाचे ठाणे आहे. लोखंड,गंधक, फॉस्फरस, कोळसा, तांबे इ. खनिजे ऊरुमचीच्या आसमंतात मिळतात; याशिवाय ऊरुमचीजवळच कारामाई येथे तेलक्षेत्र मिळाले असल्याने ऊरुमचीला औद्योगिक महत्त्व आले. मध्य चीनमधील लानजो शहराशी ऊरुमची लोहमार्गाने जोडले आहे.
लेखक : द.ह.ओक
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/26/2020
चीनमधील प्रसिध्द विद्यापीठ.