অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आउगुस्ट आडोल्फ कुंट

आउगुस्ट आडोल्फ कुंट

जन्म : १८नोव्हेंबर १८३९

मृत्यू : २१ मे १८९४

जर्मन भौतिकीविज्ञ. ध्वनिकी व प्रकाशकी  या विषयांत महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म श्व्हेरीन येथे झाला. लाइपसिक व बर्लिन येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठ (१८६७), झुरिक पॉलिटेक्निक (१८६८) आणि त्यानंतर वर्त्सबर्ग (१८७०) व स्ट्रॅसबर्ग (१८७२) येथील विद्यापीठांत अध्यापनाचे कार्य केले. स्ट्रॅसबर्ग येथील भौतिकी संस्थेचे ते एक संस्थापक होते. १८८८ साली  बर्लिन येथील भौतिकी संस्थेच्या संचालकपदावर व प्रायोगिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची  नेमणूक झाली.

पोकळ नळीच्या आतील भागातील स्थिर ध्वनितरंगांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक पद्धती शोधून काढली. वायूरूप व घनरूप माध्यमांतील ध्वनीचा वेग मोजण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. प्रकाशकीमध्ये कुंट यांनी द्रवरूप व बाष्परूप माध्यमांतील तसेच धातूच्या पातळ थरातून होणाऱ्या प्रकाशाच्या असंगत अपस्करणासंबंधी (प्रकाशाच्या तरंगलांबीनुसार पदार्थाच्या प्रणमनांकात म्हणजे वक्रीभवनांकात होणाऱ्या बदलांसंबंधी) संशोधन केले. त्यांनी काही वायू व बाष्परूप पदार्थांच्या बाबतीत ध्रुवण प्रतलाचे (विशिष्ट प्रतलात कंप पावणाऱ्या प्रकाशाच्या प्रतलाचे) चुंबकीय प्रेरणेमुळे होणाऱ्या परिवलनाचे प्रात्यक्षिक दाखविले. ऊष्मीय संवाहकता व वायूंतील घर्षण यांसंबंधीही त्यांनी संशोधन केले. ल्युबेकजवळील इझ्राएल्सडॉर्क येथे ते मृत्यू पावले.

लेखक : व.ग.भदे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate