एप्स्टाइनच्या शिल्पकलेवर घन वादाचा, तसेच आफ्रिकन-निग्रो मूर्तिशिल्पाचा प्रभाव दिसून येतो. उदा., द रॉक ड्रिल (१९१३), द मदर अँड चाइल्ड (१९१३) इत्यादी. वस्तूमधील मूलवास्तवाची कलात्मक निर्मिती साधण्याच्या उद्देशाने त्याने पुष्कळदा वस्तुविरूपण व अप्रतिरूपण केल्याचे दिसून येते. त्यामागील प्रेरणा दुर्लक्षिल्या जाऊन टीकाकारांनी त्याच्या शिल्पांवर आत्यंतिक विरूपणाचे, तर सर्वसामान्यांनी नग्नतेचे, कुरूपतेचे व पावित्र्यविडंबनाचे आरोप केले. अशा वाद ग्रस्त शिल्पाकृतींत त्याच्या प्रारंभीच्या कोरीव शिल्प मालिकेप्रमाणेच चिरंतन मातृत्वाचे प्रतीक असलेले संगमरवरी जेनेसिस शिल्प (१९३१), रीमा हे हडसन-स्मारकशिल्प (१९२५), ब्राँझची ख्रिस्तमूर्ती (१९२०) इत्यादींचा उल्लेख करता येईल. शिल्पाकृतीचा पृष्ठभाग माध्यमाच्या प्रकृतिगुणानुरूप ठेवणे, हे एप्स्टाइनचे वैशिष्ट्य होय. एप्स्टाइनने आर्नल्ड हॅस्केलसमवेत लिहिलेल्या द स्कल्प्टर स्पीक्स (१९३१) व आत्मचरित्रपर अशा लेट देअर बी स्कल्प्चर (१९४०, नवी आवृत्ती एप्स्टाइन : अॅीन ऑटोबायॉग्रफी या नावे प्रकाशित, १९५५) या पुस्तकांमध्ये त्याचे शिल्पतंत्र व जीवनवृत्तांत यांची माहिती आढळते. १९५४ मध्ये त्यास सर हा किताब देण्यात आला. लंडन येथे त्याचे निधन झाले.
लेखक - इनामदार श्री. दे.
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/30/2020
प्रख्यात आधुनिक रूमानियन शिल्पकार.
इझ्राएलचा एक शिल्पकार, मुत्सद्दी व चौथा पंतप्रधान ...
राष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ महाराष्ट्रीय शिल्पकार.
थोर भारत सेवक व पुण्याच्या प्रसिद्ध ‘सेवासदन’ संस्...