অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यांगत्सी नदी

यांगत्सी नदी

यांगत्सी नदी

चीनमधील तसेच आशिया खंडातील लांबीने सर्वांत मोठी, तर जगातील पाचव्या क्रमांकाची नदी. लांबी ५,४९४किमी. जलवाहन क्षेत्र १८,२९,००० चौ. किमी. नदीच्या खोऱ्याचा पूर्व-पश्चिम विस्तार ३,२१९ किमी. व दक्षिणोत्तर विस्तार ९५६किमी. आहे. या संपूर्ण नदीसाठी वापरण्यात येणारे यांगत्सी किंवा यांगत्सी किअँग (नदी) हे नाव चीनमधील प्राचीन यांगजहागिरीवरून आले असून ते यूरोपियनांनी दिलेले असावे.

चिनी लोक मात्र सामान्यपणे ‘जांग ज्यांग’ (लांब नदी) ह्या नावाचा वापरकरतात. जांग ज्यांग किंवा ‘डा किअँग’ (मोठी नदी) या नावानेही यांगत्सी ओळखली जाते. यूरोपियनांनी ‘ब्लू रिव्हर’ (निळी नदी)असेही नाव या नदीला दिलेले आहे. इतरही काही स्थानिक नावे यांगत्सीला आहेत. यांगत्सीच्या मधल्या व खालच्या टप्प्यांतीलपाणी तपकिरी-पिवळसर दिसते.

यांगत्सी नदी चीनच्या पश्चिम भागात, तिबेटच्या ईशान्य सरहद्दी जवळ, डांग्‌कूलापर्वत श्रेणीत, सस. पासून ५,४८६ मी. उंचीवर उगम पावते आणि चीनच्या अकरा प्रांतांमधून वाहत जाऊन पूर्वेस शांघाय जवळ पूर् व चिनी समुद्राला मिळते. नदीचा तीन-चतुर्थांशापेक्षा अधिक प्रवाह पर्वतीय प्रदेशातून वाहतो.

उलानमुलुन आणि चुताएहेयांगत्सीचे मुख्य दोन शीर्ष प्रवाह आहेत. त्यांपैकी दक्षिणेकडील‘ उलानमुलुन’ (चिनी)किंवा‘ उलानमुरेन’ (तिबेटी) या नावाने ओळखला जाणारा प्रवाह मुख्य आहे.

या दोन शीर्ष प्रवाहांच्या संगमापासूनचा तिबेटी उच्चभूमीच्या प्रदेशातील यांगत्सीचा प्रवाह उथळ व विस्तृत अशा दरी तून पूर्वेसवाहत असून, नदी पात्रात ठिकठिकाणी सरोवरे व लहानलहान जलाशय निर्माण झालेले आहेत.

तिबेटी उच्च भूमीतून बाहेर पडल्यावर बायानकारा पर्वताच्या दक्षिणेस नदी जास्त उंचीवरून आग्नेय दिशेत एकदम खाली उतरताना दिसते. येथील खडकाळ व तीव्र उताराच्या प्रदेशातून नदीने दीड ते तीन किमी. खोली ची अरुंद दरी–नि दरी निर्माण केली आहे.

या भागात ४,८७७ मी.पेक्षा अधिक उंचीची बर्फाच्छादित व हिमनद्यांनी युक्त अशी पर्वत शिखरे आहेत. आग्नेय दिशेत बरेच अंतरवाहत गेल्यावर नदी दक्षिणवाहिनी होते. यामार्गातील नदी पात्र इतके खोल व तीव्र उताराचे आहे की, काठावर साधी पाऊलवाटही आढळत नाही.

या भागात वसाहत अगदीच विरळ असून ती ही नदीपात्रापासून उंचठिकाणी आढळते.उ गमापासून ९६५किमी.अंतरावरील बाटांगपर्यंत नदीस स.पासून२,५९०मी.पर्यंत खाली उतरली आहे. याभागात यांगत्सीचा बराच सा प्रवाह तिबेट-सेचवान सरहद्दीवरून, मेकाँग आणि सॅल्‌वीन नद्यांच्या जवळून व त्यांच्याशी समांतर दक्षिण दिशेत वाहत जातो. येथे या तीन नद्या एकमेकींपासून केवळ २४ ते ४८ किमी. अंतरावर आहेत.

त्यानंतर मेकाँग–सॅलवीन् नद्या तशाच पुढे दक्षिणेस वाहत जातात. यांगत्सी मात्र एका उंच टेबललँडमुळे पुढे दक्षिणेस वाहत न जाता प्रथम ती एकदम उत्तरेस ,त्यानंतर पुन्हा दक्षिणेस वळते.

पिंगच्यू ॲननंतर सेचवान–यूनान सरहद्दीवरून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस ईपिनकडे वाहत जाते. यादरम्यान चा प्रवाह सुद्धा पर्वतीय प्रदेशातून वाहत असून नदीची दरीखोल ,रुंद व तीव्र उतारांचे काठ असलेली आहे. दरम्यान यांगत्सीला अनेक उप नद्या येऊन मिळतात.

त्यांपैकी यालुंग (लांबीसु.१,१७५किमी.)ही सर्वांत मोठी नदी आहे. उगमा पासून ईपिनपर्यंतचा नदीप्रवाहाचाप हिला टप्पा समजला जातो.ईपिनपर्यंतचा प्रवाह‘जिन्शा’ (सोनेरीवाळू)या नावाने,तर ईपिनपासून खालचा प्रवाह प्रामुख्याने यांगत्सी किअँग अथवा जांगज्यांग या नावाने ओळखला जातो.

पहिल्या टप्प्यातील खोऱ्यात राहणारे लोक परंपरागत जुन्या पद्धतीची शेती व गुरे पाळण्याचा व्यवसाय करतात. या भागात उन्हाळे उबदार व हिवाळे कडक असून पिकांच्या वाढीचा काळ चार ते पाच महिन्यांचा असतो. जास्त लोकसंख्येच्या स्थळी चिनी, डंगान, नेपाळी व भारतीय लोक आढळतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate