रशियाच्या युक्तेन सोव्हिएट प्रजासत्ताकाचे काळ्या समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ९,४१,००० (१९७२). हे कीएफच्या दक्षिणेस ४४० किमी. असून येथे कृषी अवजारे, वाहतूक, छपाई, अन्नप्रक्रिया लेथ, याऱ्या यांची सामग्री, मोटारींचे सुटे भाग जुळविणे; तेलशुद्धीकरण; पीठ, साखर, फळे, कातडी, गोण्या, दोर इत्यादींवरील प्रक्रिया; सुपरफॉस्फेट, आयोडीन, लिनोलियम, पोलादी दोर, पादत्राणे, कपडे यांचे कारखाने आहेत. राज्यविद्यापीठ तसेच तांत्रिक, शेतकी, वैद्यकीय, शिक्षक महाविद्यानये ; सागरी शिक्षण अकादमी ; विविध व्यावसायिक शाळा; संरक्षण, क्रांती, कला, उद्योग, पुराणवस्तुसंशोधन इतेयादींची संग्रहालये यांमुळे हे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रही झाले आहे. येथून धान्य, लाकूड, साखर इत्यादींचा आयात होते. समुद्रकाठी आरोग्यधामे व मृत्तिकास्नानगृहे आहेत. दुसऱ्या महायुध्दात याचे फार नुकसान झाले.
लिमये, दि.ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/9/2020
कालिकत : केरळ राज्याच्या कोझिकोडे जिल्ह्याचे प्रमु...
खंबायत संस्थान : स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थ...
याल्टा : यूरोपीय रशियातील युक्रेन सोव्हिएट सोशॅलिस...