অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फ्रीटाउन

फ्रीटाउन

फ्रीटाउन

आफ्रिकेतील सीएरा लेओन देशाची राजधानी .  लोकसंख्या  ३ , १४ , ३४०  ( १९७४ ),  अटलांटिक महासागरावरील सीएरा लेओन नदीमुखावरील सुरक्षित व खोल असे हे सर्वोत्तम नैसर्गिक बंदर असून देशातील प्रमुख शहरांशी ते लोहमार्ग व सडका यांनी जोडलेले आहे .  लुंगी हा आंतरराष्ट्रीय विमानतळ सीएरा लेओन नदीपलीकडे असून देशांतर्गत वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा हेस्टिंग्ज विमानतळ शहरापासून सुमारे  १६  किमी. वर आहे .

गुलामगिरी विरोधी चळवळीच्या पुरस्कर्त्यांनी इंग्लंडहून  १७८७  मध्ये पाठविलेल्या स्वतंत्र  आ फ्रिकी गुलामांच्या वसाहतीसाठी या शहराची निवड करण्यात आली . १७९४  मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीकारकांकडू न हे लुटण्यात आले . १८९३  मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली .  एकोणिसा व्या - विसा व्या शतकांत व्यापार आणि लष्करी दृष्ट्या सोयीचे असल्यामुळे या शहराचा विकास झाला .  दुसऱ्या महायुद्धात येथे नाविक तळ होता .  आंतरराष्ट्रीय सागरमार्गावरील जहाजांचे इंधनस्थानक म्हणूनही हे महत्त्वाचे आहे .

या बंदरातून मुख्यतः ताडतेल ,  ताडगर , ताडतंतू  ( पसाव्हा ) , आले , कोलानट , कोको ,  कॉफी वगैरे माल तसेच प्लॅटिनम ,  हिरे ,  निर्यात केले जातात . शिवाय शहरात मासे डबाबंद करणे ,  अन्नप्रक्रिया ,  साबण ,  मद्यनिर्मिती ,  पादत्राणे सिगारेटी ,  हिऱ्यांना पैलू पाडणे वगैरे अनेकविध व्यवसाय चालतात . शहरात शासकी य कार्यालये व लष्करी तळ असून अनेक मशिदी व चर्च आहेत . त्यांपैकी अँग्लिकन सेंट जॉर्ज कॅथीड्रल प्रसिद्ध आहेत .

सिएरा लेओन विद्यापीठ  ( स्था . १९६७ )  येथे असून फोरा बे महाविद्यालय ,  फ्री टाउन शिक्षक महाविद्यालय ,  तंत्रविद्यालय इ .  शैक्षणिक संस्था येथे आहेत .  येथील राष्ट्रीय संग्रहालयात ऐतिहासिक कागदपत्रे आणि पारंपारिक काष्ठशिल्पे व शिळाशिल्पे यांचे जतन केलेले आहे .

 

लिमये ,  दि .  ह .

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate