महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. सातारा : किन्हईचे हेमाडपंथी मंदिर कोरेगावच्या उत्तरेला वसना नदीच्या तीरावर वसलेले गाव म्हणजे किन्हई ! गावाच्या पूर्वेकडील टेकडीवर म्हणजेच साखरगडावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराला 28 फेब्रुवारी 2015 रोजी युनेस्कोतर्फे सांस्कृतिक वारसा संवर्धन 2014 सालातील एशिया पॅसेफिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. औंधच्या पंतप्रतिनिधींनी 250 वर्षापूर्वीचे मंदिराचे हेमाडपंथी शैलीतील बांधकाम केले. ते आजही नव्या वास्तुशास्त्राला प्रेरित करणारे आहे. कसे पोहोचाल? साताऱ्यापासून 25 किलोमीटर आणि कोरेगावच्या उत्तेरला 11 किलोमीटरवर किन्हई हे गाव आहे.
सोलापूर : पंढरपूर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत पंढरपूरचा विठुराया. पंढरपूरला महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हटले जाते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला दिंड्या नाचवत लाखो वारकरी पंढरपूरला येतात. पंढरपूर वारकरी संप्रदायाचे केंद्र असून कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातील भाविक येथे दर्शनास येतात. कसे पोहोचाल? पंढरपुरात भविकांना येण्यासाठी एस. टी आणि मिरज, कुर्डूवाडी येथून रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. अक्कलकोट अक्कलकोट हे देशभरातील स्वामी समर्थ भक्तांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. अक्कलकोट शहराच्या बाहेर बनामध्ये एका वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ बसत असत. याच वटवृक्षाखाली असणारी महाराजांची समाधी भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. अक्कलकोटचे संस्थानिक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले (तिसरे) यांनी निर्माण केलेले शस्त्रसंग्रहालय प्रसिद्ध आहे. शहरात असलेले दोन राजवाडे आणि नव्या राजवाड्यामध्ये असलेले हत्यारांचे संग्रहालय पर्यटकांचे आकर्षण आहे. कसे पोहोचाल? सोलापूरपासून 40 किलोमीटरवर अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र आहे. अक्कलकोटला जाण्याकरिता सोलापूर रेल्वे स्थानकावरून रेल्वे आणि बससेवा उपलब्ध आहेत.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020
देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्य...