অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाशिम जिल्ह्याविषयी

वाशिम जिल्ह्याविषयी

प्रस्तावना

वाशिम विदर्भाच्या पूर्वेकडील भागात स्थित आहे. त्याच्या उत्तरेला अकोला, उत्तर-पूर्व मध्ये अमरावती आहे, हिंगोली दक्षिणेस आहे, बुलढाणा पश्चिमेला आहे, यवतमाळ हा पूर्वेस आहे. पैनगंगा नदी ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. हे रिसोड च्या तहसील माध्यमातून वाहते. पुढे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. पैनगंगाची मुख्य उपनदी कास ही नदी आहे. कास नदीचा परिसर शेळगाव राजगुरे या गावापासून सुमारे 1 किमी अंतरावर आहे. अरुणावती नदी आणि त्याच्या उपनद्यांतील वाशिम तालुक्यात उगम होऊन ते यवतमाळ जिल्ह्यात मंगरुळपीर व मानोरा तालुक्यामधून वाहते. काटेपुना नदीचा उगम जिल्ह्याच्या डोंगराळ भागात होतो आणि मालेगावच्या तहसीलद्वारे उत्तरेकडे वाहून अकोला जिल्ह्यात प्रवेश करतो. इतिहास :- वाशिमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे.यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ.स.पूर्व सुमारे ३००पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती.प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन. वाशिम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसर्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती.त्यानंतर इंग्रजांच्या राज्यात वर्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशिमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर जानेवारी २६ १९९८ मध्ये पुन्हा वाशिम हा जिल्हा घोषित करण्यात आला. विभागाचे नाव----अमरावती विभाग मुख्यालय----वाशीम तालुके कारंजा ,मंगरुळपीर ,मानोरा,मालेगाव,रिसोड,वाशीम तालुका

क्षेत्रफळ - ५,१५० चौरस किमी (१,९९० चौ. मैल) लोकसंख्या--------११,९६,७१४ (२०११) लोकसंख्या घनता 250 / 〖किमी〗^(२ )

साक्षरता दर - ८१.७% लिंग गुणोत्तर--------१.०७ (९६० महिला १०००पुरुषमागे) लोकसभा मतदारसंघ-----यवतमाळ-वाशीम

विधानसभा मतदारसंघ- -कारंजा,रिसोड,वाशीम भूगोल :- वाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कास ही तिची मुख्य उपनदी आहे. कास नदी पैनगंगेस मसला पेन या गावा जवळ मिळते. अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते आणि मंगरुळपीर व मानोरा तालुक्यातून वाहते. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. पाऊस जुने ते सप्टेंबर मध्ये दक्षिण मान्सून पासून आहे. हवामान उष्ण व कोरडा उन्हाळा आणि थंड हिवाळा. भारत सरकारच्या champion of the change नुसार क्रमवारी:- (ओक्टोबर २०१९ नुसार ) आरोग्य आणि पोषण :- १९ वा क्रमांक शिक्षण :- ९ वा क्रमांक शेती आणि जल व्यवस्थापन :- ६४ वा क्रमांक आर्थिक आणि कौशल्य विकास:- ५२ वा क्रमांक पायाभूत सुविधा :- २ रा क्रमांक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:- श्री संत अमरदास बाबा मंदिर ऋषीवट (रिसोड) श्री पिंगळाशी देवी(रिसोड) श्री सितला मंदिर (रिसोड) आप्पास्वामी मंदिर (रिसोड) बालाजी मंदिर (वाशीम) श्री रेणुकामाता देवाळा श्री मध्यमेश्वर मंदिर श्रीक्षेत्र पोहरादेवी पद्मतीर्थ शिवमंदिर गणपती मंदिर हिवरा (नवसाचा गणपती) सरस्वती मंदिर (कारंजा) सखाराम महाराज मंदिर (लोणी) चामुंडा देवी वाशिम गोंदेश्वर बालाजी मंदिर वाशिम वाशिम जिल्हातील मुख्य

पिके:- सोयाबीन गहू ज्वारी जरी तूर कापूस ऊस हळद पोषण:- पांच वर्षाखालील बालके :- Stunting या गटात ४१.१% बालके Wasting या गटात ३२.५% बालके कमी वजनाची बालके ४२.९% अशक्तपणा(anemia) ६०.३% बालके प्रजनन काळातील महिला:-(women of reproductive age) अशक्तपणा (anemia) :- ३५.५% महिला बॉडी मास इंडेक्स(बीएमआय) १८.५ किग्र/ 〖मी 〗^(२ ) पेक्षा कमी असणाऱ्या महिला २६.६% हेल्पलाइन:- नागरिकांचा कॉल सेंटर - १५५३०० बाल हेल्पलाइन - १०९८ महिला हेल्पलाइन - १०९१ गुन्हा थांबविणारे - १०९० आपत्ति व्यवस्थापन:- आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय / राज्य / जिल्हा ---------------------------------कंट्रोल रूम संपर्क क्रमांक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार हेल्प लाईन नंबर---०११-१०७८ महाराष्ट्र नियंत्रण कक्ष-------------------------------------टेलिफोन क्रमांक -१२२-२२०२९०९० फॅक्सः ०२२-२२०२६७१२ जिल्हा वाशिम, महाराष्ट्र नियंत्रण कक्ष---------------------------- १०७७ टेलिफोन: ०७२५२-२३४२३८ पोलिस विभाग:- जिल्हा पोलीस अधीक्षक----------०७२५२-२३२१३४,०७२५२-२३२००३ अतिरिक्त पोलिस अधीक्षक -----०७२५२-२३३१९१ पोलिस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा---०७२५२-२३२१५३ पोलिस निरीक्षक एल सी. बी----------०७२५२-२३२०७३ पोलिस नियंत्रण कक्ष-----०७२५२-२३२७५५ उप विभागीय पोलीस अधिकारी, वाशिम----०७२५२-२३२५४५ ,०७२५२-२३३२४१ पोलीस चौकी,वाशिम------०७२५२-२३२०९९ ,०७२५२-२३२०७३ पोलीस चौकी, रिसोड------०७२५१-२२२३५६ पोलीस चौकी, मालेगाव-----०७२५४-२३१२५३ पोलीस चौकी, मंगरुलपीर-----०७२५३-२३०३३३ पोलीस चौकी, मानोरा-------०७२५३-२३३२२९ पोलीस चौकी, कारंजा-------०७२५६-२२२०८८ पोलीस चौकी, आसेगांव------०७२५३-२३५५८८ पोलीस चौकी, अनसिंग-------०७२५२२२६०३४ पोलीस चौकी,धनज---------०७२५६-२३२०३० पोलीस चौकी, शिरपुर-------०७२५४-२३४००३ सेवा:- एनआयसीच्या सेवांसाठी नोंदणी(बाह्यदुवा :-- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सातबारा (७/१२) माझा आधार माझी ओळख पासपोर्ट सेवा बाह्यदुवा:- https://washim.gov.in/ सार्वजनिक सुविधा :- टपाल ----- १ बँका ------४ रुग्णालय ------१ नगरपालिका------५ बसस्थानक-------५ वीज-------६

अंतिम सुधारित : 4/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate