पंचवटी
महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. नासिक्य (नासिक) म्हणजेच पंचवटी असा वायुपुराणात उल्लेख आढळतो. गोदावरीच्या डाव्या काठावरील नासिक शहराचा भाग, पंचवटी म्हणून परंपरेने ओळखतात. येथील सीता गुंफे जवळील पाच वटवृक्षांमुळे यास पंचवटी हे नाव पडले असावे. वनवासकाळात रामाने येथे वास्तव्य केले होते आणि या काळात नासिकजवळच असलेल्या सायखेडे गावी रामाने मारीचवध केला; तसेच लक्ष्मणाने नासिकजवळच शूर्पणखेला विरूप केले आणि या पंचवटीतूनच रावणाने सीतारहण केले, असे मानले जाते. पंचवटीच्या पूर्वेस सु. दीड कमी. वर तपोवन असून आसपास बरीच तीर्थे आहेत. येथील सीतागुंफा, श्रीराम मंदिर, रामेश्वर मंदिर (नारोशंकर मंदिर) ही प्रेक्षणीय आहेत.
लेखक-खरे, ग. ह.
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.