हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. कसबा गणपती लाल महालाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. त्यामुळे या गणपतीला गणेश उत्सव मिरवणुकीत पहिल्या मानाचे स्थान असते. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली. दादोजी कोंडदेव यांनी त्यांचे वतीने गणपतीच्या पुतळयासमोर तंबू बांधला. आता ते पुण्यातील प्रसिध्द मंदिर आहे.
येथे भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर पुणे शहरापासून 125 कि.मी. अंतरावर खेड तालुक्याजवळ आहे. हे महाराष्ट्रातील पाच जोतिर्लिंगांपैकी एक जोतिर्लिंग आहे. नाना फडवणीसांनी या ठिकाणी शंकराचे मंदिर बांधले होते. भीमाशंकरच्या जवळच मनमाडच्या टेकडया आहेत. या टेकडयांवर भुतींग, अंबा-अंबिका, व भीमाशंकर यांच्या कोरीव लेण्या आहेत. मान्सून आणि थंडीच्या दिवसांत भीमाशंकरच्या सौंदर्यात अधिक भर पडते. भीमाशंकर हे राखीव जंगल आहे आणि तेथे जंगली प्राण्यांचे अभयारण्य आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे व फुले पहायला मिळतात.
पुण्यापासून 30 कि.मी. अंतरावर असलेले बनेश्वर हे एक अतिशय सुन्दर ठिकाण आहे. येथे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेले महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी विष्णु, लक्ष्मी, महादेव यांच्या नेत्रदिपक मुर्ती असून तेथे पाच शिवलिंगही आहेत. मंदिर खोल अशा झाडा मध्ये असल्यामुळे ते एखाद्या जंगलासारखे दिसते म्हणून त्याला बनेश्वर असे म्हणतात. सुन्दर बागा, लहानलहान धबधबे, व पाण्याचे ओहोळ यांमुळे बनेश्वर हे एक सहलीचे ठिकाण बनले आहे.
ही एक लहान टेकडी आहे जी दुर्गा देवीला अर्पण केलेली आहे. या आधी तेथे अंबेश्वरी ही देवता होती. वर्षातून एकदा अश्विन महिन्यात येथे नवरात्री जत्रा भरते. हे देऊळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले.
हे पुण्यापासून 40 कि. मी. अंतरावर असून तेथे खंडोबाचे प्राचीन मंदिर असल्यामुळे ते खंडोबाची जेजुरी म्हणुन ओळखले जाते. चैत्र, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात येथे जत्रा भरते. मंदिरात जाण्याच्या वाटेवरुन आपल्याला दिवे घाट दिसतो. या मंदिरातील दिपमाला प्रसिध्द आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 200 पाय-या चढून जावे लागते. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी याच ठिकाणी मुघल सत्ते विरुध्द व्यूहरचना करण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे जेजुरीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. त्या काळातील बरीचशी शस्त्रे आपल्याला तेथे पाहायला मिळतात.
गणपती बाप्पा हे त्याच्या भक्तांचे रक्षणकर्ता असतात. निसर्गाने शिल्पाकृती केलेल्या अशा गणपतीच्या आठ प्रतिमा निसर्गात सापडल्या आणि त्या जेथे सापडल्या तेथेच त्यांची मंदिर बांधून स्थापना करण्यात आली. या सर्व प्रतिमा स्वयंभू आहेत. या अष्टविनायकांपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नहर व लेण्याद्रीचा गिरीजात्मक हे पाच गणपती पुणे जिल्हयात आहेत.
हे संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान असून ते इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. या ठिकाणी भाविक मोठया प्रमाणात येत असतात. हे पुण्यापासून 34 कि.मी. अंतरावर आहे.
पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रुपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिध्द ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिध्द भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
पुण्याच्या दक्षिण भागात नारायणपूर गावात संत चांगदेव व श्री दत्ताचे प्रसिध्द मंदिर आहे. यात्रेकरु या ठिकाणी येऊन जुन्या औदुबराच्या झाडाची पुजा करतात व नारायणेश्वर मंदिराला भेट देतात. या मंदिरातील शिल्पाकृती ही यादव कालीन आहे.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : http://pune.gov.in/puneCollectorate/Tourism/mReligiousPlaces.aspx
अंतिम सुधारित : 1/30/2020
बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभाग मध्ये असून विदर्भा...
दिग्रस मधील घंटी बाबाची यात्रा व वणी येथील श्री रं...
पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्ह...
राज्याचे मुख्य असलेले कोल्हापूर शहर प्राचीन शहर आह...