हा मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे. सैबेरियातून येणाऱ्या गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल.
हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध व विकसित झाले आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात पर्यटक येथे गर्दी करतात. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुणे मुंबईहून ये - जा करत असतात.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत :
अंतिम सुधारित : 7/6/2020
सातारा जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांची माहिती यामध...
जिल्हयात जव्हार व सूर्यमाळ ही थंड हवेची तर अर्ना...
महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेली शेकरू ही खार या जंगल...
ठाणे जिल्हयातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 कि.म...