कोल्हापूरपासून 65 कि.मी. अंतरावर असलेले व नृसिंहवाडी या प्रसिध्द दत्तस्थानापासून फक्त 12 कि.मी. अंतरावर असलेले खिद्रापूर हे स्थान म्हणजे अत्युत्कृष्ट शिल्पकामाने नटलेल्या प्राचीन कोपेश्वर शिवमंदिर व जैनमंदिर यांच्या दर्शनाने अचंबित व्हावे असे अप्रतिम ठिकाण आहे. पर्यटन जगताला आजवर फारसे माहिती नसलेले हे ठिकाण आता पर्यटनवृध्दीसाठी एक महत्वाचे स्थान म्हणून प्रसिध्दीस येत आहे.
कृष्णा नदीच्या तीरावर असलेले कोपेश्वर महादेवाचे भव्य मंदिर भारतीय पुरातत्व विभागाकडे संरक्षित वास्तू म्हणून देखभालीस आहे. 12 व्या शतकात बांधण्यात आलेल्या या भव्य मंदिराची लांबी 104 फुट, रूंदी 65 फुट तर उंची 53 फुट आहे. मंदिराला गर्भगृह, दोन सभामंडप व सभामंडपापुढे स्वर्गमंडप असे चार भाग आहेत. मंदिर 92 हत्तींच्या अर्धवतरुळाकार पाठीवर उभारलेले असून मंदिरात अप्रतिम नक्षीकाम केलेले एकूण 105 खांब आहेत. हत्तीं व खांबांचे वैशिष्टय़ म्हणजे कोणताही एक हत्ती वा खांब दुसर्यासारखा नाही. मंदिर आतून व बाहेरून असंख्य शिल्पाकृतींनी नटलेले आहे.
लेखन: ज्ञानदीप
माहिती स्रोत:
अंतिम सुधारित : 1/30/2020
खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील अण्णासो...
शिल्पाविष्कार हा इंद्रियगोचर त्रिमित आविष्कार असल्...