অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्री सप्तशृंगी देवी, सप्तशृंग गड, नाशिक

श्री सप्तशृंगी देवी, सप्तशृंग गड, नाशिक

नाशिकच्या  उत्तरेस ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या  पूर्व-पश्चिम पर्वत रांगेत समुद्र  सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे.

येथील निसर्ग सौंदर्य व भक्तीने भारावलेलं वातावरण भाविक व  पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. सप्तशृंग गडाच्या पूर्वेला असलेला मार्कंण्डेय डोंगर, गडाच्या दक्षिणेला असलेले गणेश मंदिर व सतीचा कडा,  आजुबाजूला बारमाही पाण्याने तुडूंब भरलेली धरणे ही आकर्षण होय. या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी  नाशिक येथून नांदुरी या गावी येऊन सप्तशृंग गडावर येता येते.

गुजरात राज्यातून येणार्यान भाविकांना सापूतारा, कनाशी, अभोणा मार्गे सप्तशृंग गडावर येता येते. रस्ता रूंद झाल्याने महामंडळाच्या  बसेस देखील थेट गडावर येऊ लागल्या आहेत. गिरीजा नदीच्या तिराजवळ सर्व पर्वतांत श्रेष्ठ असा सप्तशृंग पर्वत आहे. सह्याद्री पर्वताचाच एक भाग असलेल्या यास सात शिखरे आहेत. त्यावर श्रीजगदंबेचे स्वयंभू स्थान आहे.

हीच भगवती रक्त, बीज आणि शुंभ- निशुंभ आदि सर्व दैत्यांसहित सर्व श्रेष्ठ अशा महिषासूर नामक दैत्याचा वध करून या सप्तशृंग पर्वतावर निरामय स्थान पाहून राहू लागली. या देविचे नाव दुर्गा आहे. हिलाच सप्तशृंग देवी म्हणतात. या देवीला आठरा हात असून तिने सिंहावर आरोहन केले आहे. ही देवी भक्तांवर पूर्ण कृपाकरनारी आहे.

या देवीचे दर्शन करणार्यांअच्या अंतकरणात आनंद निर्माण होतो. सप्तरश्रृंग गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहेत. येथून ५०० पाय-या चढून वर गेल्यावर डोंगराच्या कपारीत ८ फूट उंचीची शेंदूरचर्चित रक्तवर्णीय अशी महाकाय स्वयंभू सप्तश्रृंग मातेचे दर्शन घडते.

जगदंबेचे दर्शन झाल्याबरोबर मन प्रसन्न होते. भक्तांचा थकवा नाहीसा होतो. श्री भगवतीचे १८ हात असून तिला अष्टभुजा असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तिने वेगवेगळे आयुधे धारण केलेली आहेत. श्री भगवतीचे मूर्ती ८ फूट उंचीची असल्याने तिला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात.

डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळयात मंगळसुत्र व पुतळयाचे गाठले, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार अंगावर घालण्यात येतात. श्री भगवतीची ञिकाल पुजा करण्यात येते. पहाटेची काकड आरती ६ वाजता त्यानंतर ७ ते ९ महापुजा व आरती, माध्यान्ह  आरती दु.१२ वाजता, शेज आरती ७.३० वा.

 

माहिती स्त्रोत : http://saptashrungnivasinidevitrust.org/

माहिती संकलन : अतुल पगार

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate