यूगोस्लाव्हियाच्या `कार्स्ट' विभागात आढळणा.या भूमिस्वरुपाला व फ्रान्ंस, इंग्लडं,अमेरिका,क्यूबा, फिलिपीन्स, इंडोनिशिया इ. देशांच्या काही भांगात आढळणा-या तशाच भूमिस्वरुपाला कार्स्ट भूमिस्वरुप म्हणतात.
चुनखडकाच्या प्रदेशात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडामुळे किंचित अम्लधर्मी झालेले पावसाचे पाणी खडकांच्या फटींत शिरुन चुन्याचा काही अंश विरघळविते. त्यामुळे फटी रुंदावतात;पाणी भूपृष्ठाखालून वाहते व पुढे कोठेतरी बाहेर येते;
भूपृष्ठाखाली लहानमोठया गुहा तयार होतात; दीर्घ काळानंतर काहंच्या छपंरापासून लोंबणारे व तळावर उभे असलेले अधोमुख व ऊर्ध्वमुख लवणस्ंतभ तयार होतात;जमिनीवर विवरे तयार होऊन लांबट दरी बनते आणि तेथे न विरघळलेल्या पदार्थांमुळे तयार झालेली मृदा व पाणी यांवर शेती होऊ शकते. छोटया प्रवाहांचा बहुधा अभावच असतो, कारण पावसाचे पाणी चटकन जमिनीतच शिरते. काही गुहा तेथील आश्चर्यकारक नैसर्गिक दृश्यांमुळे प्रवांशाचे आकर्षण ठरल्या आहेत.
कुमठेकर, ज.ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँकेची संलग्न संस्...
डाल्मेशिया : पूर्व यूरोपातील यूगोस्लाव्हियाच्या एड...
ऱ्येका
कोणताही लोकसमूह अनेक व्यक्तींचा समूह असतो.