অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पैनगंगा

पैनगंगा

पैनगंगा

महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी. लांबी ६७६ किमी. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी. ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातपश्चिम सरहद्दीलगत अजिंठा डोंगररांगेत उगम पावते.

उगमानंतर ती आग्नेयीकडे बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून वाहते. पुढे ती परभणी-यवतमाळ व यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जूगादजवळ वर्धा नदीस मिळते.

हा संयुक्त प्रवाह वर्धा नदी म्हणून ओळखला जातो. कयाधू अरुणावती अडाणवाघाडीपूस इ. पैनगंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस महत्त्व असूनअपर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात इसापूरजवळ धरण बांधले जात आहे.

त्यापासून शेतीस पाणीपुरवठा केला जाईल. देऊळघाटवणी पुसदपांढरकवडा चिखली मेहेकर ही पैनगंगा नदीखोऱ्यातील महत्त्वाची शहरे आहेत.

 

सावंतप्र. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate