भयावह आग लागल्याचे अनेक प्रसंग आपण टी.व्ही अथवा प्रत्यक्षात पाहिले असतील. कुठेही आग लागली की अग्निशमन दलाची गाडी सायरन वाजवत घटनास्थळी येते. फायरमन जीवावर उदार होऊन आग विझविण्यासाठी लढा देत असतात. अत्यंत धाडसाचे आणि जोखमीचे हे क्षेत्र असून यातील करिअर करण्यासाठी मोठे मनोधैर्य असावे लागते. या आव्हानात्मक क्षेत्रातील करिअरच्या संधींचा आढावा खास करिअरनामा या सदरासाठी.
उपलब्ध कोर्सेस
उप स्थानक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी (पुरुष)
प्रशिक्षण कालावधी- १ वर्ष (५२ आठवडे)
उपलब्ध जागांची संख्या- ३० ते ४०
वयोमर्यादा-
उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे या दरम्यानचे असावे. तसेच एस.सी./ एस.टी./एन.टी/ व्हीजेएनटी/ एस.बी.सी. या उमेदवारांसाठी ५ वर्ष शिथील तसेच ओबीसी करिता ३ वर्ष शिथील.
शैक्षणिक पात्रता-
उमेदवार कोणत्याही शाखेतील किमान ५० टक्के गुणांनी (खुला प्रवर्ग) पदवी उत्तीर्ण असावा. तसेच एस.सी./ एस.टी./एन.टी/ व्हीजेएनटी/ एस.बी.सी. ओबीसी या उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण असणे आवश्यक.
शारिरीक पात्रता
उंची- १६५ से.मी. किमान
वजन- ५० किलो किमान
छाती- ८१से.मी. (सर्वसाधारण) ८६ से.मी. (फुगवून)
अधिवास प्रमाणपत्र-
उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम
प्रशिक्षण कालावधी- ०६ महिने (२६ आठवडे)
उपलब्ध जागांची संख्या- ३० ते ४०
वयोमर्यादा-
उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्षे या दरम्यानचे असावे. तसेच एस.सी./ एस.टी./एन.टी/ व्हीजेएनटी/ एस.बी.सी. या उमेदवारांसाठी ५ वर्ष तसेच ओबीसी करिता ३ वर्ष शिथील.
शैक्षणिक पात्रता-
उमेदवार मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान एस.एस.सी उत्तीर्ण ५० टक्के गुणांनी (खुला प्रवर्ग) तसेच एस.सी./ एस.टी./एन.टी/ व्हीजेएनटी/ एस.बी.सी. ओबीसी या उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण असणे आवश्यक.
शारिरीक पात्रता
उंची- १६५ से.मी. किमान
वजन- ५० किलो किमान
छाती- ८१से.मी. (सर्वसाधारण) ८६ से.मी. (फुगवून)
अधिवास प्रमाणपत्र-
उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी http://www.mahafireservice.gov.in
संकेतस्थळ- http://www.mahafireservice.gov.in
पत्ता
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी विद्यानगरी, सांताक्रुज (पू) मुंबई ४०००९८
दूरध्वनी- ०२२-२६६७७५५५
लेखक: सचिन के. पाटील
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020