कम्युनिकेशन डिझाईन, वेब डिझाईन, फॅशन डिझाईन, ॲनीमेशन यासारखी क्षेत्रे नवीन तंत्रज्ञानामुळे विस्तारली आहेत. विस्तारलेल्या या क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्यांसाठी जगभर कार्य करण्याची संधी उपलब्ध आहे. दूरचित्रवाहिन्या-वृत्तवाहिन्या म्हणजेच टी.व्ही., रेडिओ, वेब पोर्टल, बॉलीवूड अशा एक ना अनेक शाखा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे विकसीत झाल्या आहेत. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात प्राविण्य असलेल्यांची मागणीही वाढत आहे. यासंदर्भातील विविध शाखांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे –
कम्युनिकेशन डिझाईन : या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी १० + २ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स असून, यामध्ये तुम्ही डिझाईन ॲण्ड ड्रॉईंग, इमेज एडीटींग, कॉन्सेप्ट ऑफ ग्राफिक ॲण्ड इलुस्ट्रेशन, ग्राफीक डीझाईन, पेज लेआऊट डीझाईन, कॉन्सेप्ट ऑफ वेब डिझाईन, व्हिडीओ एडिटींग हे विषय शिक्षणक्रमांतर्गत असतात. या शिक्षणक्रमानंतर विविध दूरचित्रवाहिन्या-वृत्तवाहिन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
डीझाईन इन व्हीज्युअल कम्युनिकेशन (ग्राफीक्स) : ही पदवी चार वर्षांची असून, प्रवेश घेण्यासाठी १२वी मध्ये ५५ % गुण असणे आवश्यक आहेत. यामध्ये कलर फॉर्म ॲण्ड कम्पोसिशन, टायपोग्राफी ॲण्ड फॉण्ट डिझाईन, ड्रॉईंग ॲण्ड व्हीज्युअल इलुस्ट्रेशन, ॲडव्हान्स फोटोग्राफी, ॲडव्हरटायजींग ॲण्ड मार्केटींग, कार्पोरेट आयडेंटीटी डिझाईन, प्रिंटींग टेक्नॉलॉजी ॲण्ड इंडस्ट्री इंटरफेस या विषयाचे तज्ञ होता येते. ग्राफिक्सचे क्षेत्र विस्तारलेले असून करीअरच्या विविध संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत.
एनिमेशन फिल्म डीझाईन : हा १० महिन्यांचा शिक्षणक्रम असून, यास प्रवेश घेण्यासाठी १०+२ शिक्षणक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. या कोर्समध्ये बेसीक शेप्स ॲण्ड स्केचींग टेक्नीक्स, ॲनोटॉमी ड्रॉईंग, बॉडी लॅंग्वेज ॲण्ड एक्सप्रेशन, लाईट, कलर ॲण्ड पर्सपेक्टीव्ह, क्रिएटींग डिजिटल आर्ट, एनीमेशन कॉन्सेप्ट, स्क्रीप्ट रायटींग फॉर ॲनीमेशन, चार्टर डीझाईन ॲण्ड डेव्हलपमेंट, ॲक्टींग ॲण्ड व्हाईस कॅरेक्टराझेशन, कॉन्सेप्ट आर्ट ॲण्ड इन्स्पीरेशनल स्केच या विषयांचे ज्ञान प्राप्त होते. एक्सेंचर, एनडीटीव्ही, टीसीएस अशा विविध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
बी.ए. इन फॅशन कम्युनिकेशन : हा ३ वर्षाचा शिक्षणक्रम असून, प्रवेश घेण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सत्यम टेक्नॉलॉजी, सोनी, एनआयआयटी, वाटिका ग्रुप अशा विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॅशन कम्युनिकेशन : हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदविका कोर्स असून, या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फॅशन सायकोलॉजी, फॅशन रिप्रेझेटेशन टुल्स ॲण्ड टेक्नीक्स, बेसीक ग्राफीक डीझाईन, रिसर्च मेथड ॲण्ड स्टॅटीस्टीकल टेक्नीक्स आणि मटेरियल एक्सप्लोरेशन यासारखे विषयातील शिक्षण दिले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता फॅशन क्षेत्रानेही भरारी घेतली आहे. फॅशन डिझायनर म्हणूनही काम करण्याची संधी प्राप्त होते.
बी.एस.स्सी. + एम.एस्सी. इन कम्युनिकेशन डिझाईन : हा ५ वर्षांचा कोर्स असून, या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक या शिक्षणक्रमानंतर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करीअर करण्याची संधी प्राप्त होते.
बी.एस.स्सी. इन मास कम्युनिकेशन ॲण्ड व्हीडीओग्राफी : हा ३ वर्षाचा शिक्षणक्रम असून तुम्ही १२ वी नंतर प्रवेश घेऊ शकता. मास कम्युनिकेशनची ओळख, कम्युनिकेशन कॉन्सेप्ट ॲण्ड मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, रिलीव्हन्स ऑफ कम्युनिकेशन थेयरीज टू प्रॅक्टीस, इम्पॅक्ट ॲण्ड इफेक्ट ऑफ कम्युनिकेशन, ओल्ड ॲण्ड न्यु मिडीया यासारखे जनसंज्ञापन आणि विविध माध्यमांशी आणि टी.व्ही. मीडियाशी संबंधीत टेक्नीकल विषयांची माहिती मिळते. या शिक्षणक्रमानंतर वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या आणि संबंधीत क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते.
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आणखीही काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याची माहिती घेऊ या पुढील भागात.
लेखिका - श्रद्धा मेश्राम नलावडे
meshram.shraddha@gmail.com
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/4/2020