इंटेरियर डिझाईन क्षेत्राचा विस्तार वाढत असतानाच वास्तुविशारद यांचीही मागणीही वाढत आहे. वास्तुविशारद आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून नवनवीन संशोधन पुढे येत आहेत. या अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत प्रशिक्षण घेऊन इंटीरियर क्षेत्रात करीयरच्या संधी विस्तारत आहेत.
डिप्लोमा इन इंटीरियर आर्कीटेक्चर ॲण्ड डिझाईन - हा 7 महिन्याचा शिक्षणक्रम असुन, 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्रीएटीव्ह, डीझाईन व्हीज्युअलायझेशन, फोटोशॉप हा अभ्यासक्रम आहे.
डिप्लोमा इन इंटीरीयर डिझाईन - हा एक वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सहारा ग्रुप, हाय टेक एव्हेनु, डीएलफ, ऑल ट्रेड कन्स्ट्रक्शन हे अभ्यासक्रम असतील.
अंडरग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटीरियर डिझाईन - हा ३ वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
बी.एस.स्सी. इंटीरियर डिझाईन - हा ३ वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10+2 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. थेअरी ऑफ मटेरीयल, ग्राफीक डिझाईन, बेसीक डिझाईन, इंटेरियर डिझाईन हे विषय शिक्षणक्रमा दरम्यान असतात. एशियन इंटीरिओ, होम टाऊन, एम.के.डिझाईन स्टुडिओ, सारर्थी इंटेरियर्स आदी नामांकित कंपन्यामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंटीरियर डिझाईन - हा एक वर्षाचा पदविका शिक्षणक्रम असून 10 +2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मास्टर डिप्लोमा इन इंटीरियर आर्कीटेक्चर ॲण्ड डिझाईन - एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम असून, 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
फाउंडेशन प्रोग्राम इन इंटीरियर डिझाईन - एक वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रोफेशनल इंटीरियर डिझाईन - हा दोन वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंटीरियर लॅण्डस्केपींग ॲण्ड डिझाईन स्टुडिओ, बिल्डींग कन्स्ट्रक्शन फॉर इंटीरियर डिझाईन, मटेरियल ॲण्ड कन्स्ट्रक्शन टेक्नीक, वास्तु इन इंटेरियर आदी विषयांचा समावेश असतो. फ्युचर ग्रुप, रेमन्ड्स यासारख्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
स्पेशलायझेशन प्रोग्राम इन इंटेरियर डिझाईन - हा ३ वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फंडामेंटल ऑफ डिझाईन, व्हीज्युअल कम्युनिकेशन ॲण्ड प्रेझेंटेशन, स्टुडिओ ऑफ रेसिडेंशीअल स्पेस, इंटेरियर कंन्स्ट्रक्शन ॲण्ड डिटेलींग, असोशिअल मटेरियल ॲण्ड सिस्टम आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो. कोका कोला, गोदरेज, एअर टेल, स्पाईस जेट, पँटालुन, विल्स लाईफस्टाईल या नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
फाउंडेशन प्रोग्राम इन इंटेरियर डिझाईन - एक वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फंडामेंटल ऑफ डिझाईन, व्हीज्युअल कम्युनिकेशन ॲण्ड प्रेझेंटेशन, स्टुडिओ ऑफ रेसिडेंशीअल स्पेस, इंटेरियर कंन्स्ट्रक्शन ॲण्ड डिटेलींग, असेंशिअल मटेरियल ॲण्ड सिस्टम या विषयांची मुलभूत माहिती अभ्यासासाठी असते.
इंटेरियर ॲण्ड फर्नीचर पदवी - 4 वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, प्रवेशासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉटेल इंटेरियर - हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम असून, कोटक बँक, रेडीओ मिर्ची, ओएनजीसी, विर्पो अशा नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
सर्टीफीकेट इन टेक्सटाईल फॉर इंटेरियर ॲण्ड फॅशन - हा एक वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऍमेझॉन, लाइफ स्टाईल, बाटा इंडीया, स्नॅपडिल, स्पायकर, ब्लॅकबेरी क्लोथींग या नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
लेखिका - श्रद्धा मेश्राम
meshram.shraddha@gmail.com
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/26/2020