पहिल्या भागात कम्युनिकेशन डिझाईन, वेब डिझाईन, फॅशन डिझाईन या अत्याधुनिक क्षेत्रात करियर करण्यासाठीच्या विविध कोर्सची माहिती घेतली. त्याच क्षेत्रासंदर्भातील आणखी काही पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमासंदर्भात थोडक्यात माहिती आजच्या भागात घेऊया...
हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून १२ वीनंतर तुम्ही यास प्रवेश घेऊ शकता. टेक्नॉलॉजीच्या युगात मनोरंजनाचे साधन म्हणून असंख्य नवीन गेम रोज आपणास इंटरनेटवर पाहावयास मिळतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच आज टेक्नॉलॉजीचा वापर करत असल्याने मनोरंजनाचे साधन म्हणूनही मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो.
हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून 12 वीनंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. यामध्ये मुख्यत्वेकरून इंटेरियर डिझाईन, ग्राफीक डिझाईन, वेब डिझाईन, मल्टी मिडीया आणि ॲनिमेशन या विविध शिक्षणक्रमांना तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि तज्ञ म्हणून तुम्ही स्वत:चा व्यवसायही करू शकता.
हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून 12 वीनंतर प्रवेश घेऊ शकता. आयसीआयसीआय, कोटक, एनआयआयटी, टाईम्स ग्रुप, अर्थ इन्फ्रा अशा नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. आदित्य बिरला ग्रुप, एअरटेल, डेल, फोर्ड मोटर्स, वोडाफोन, यामाहा मोटर्स अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डीश टीव्ही, टिंबरलँड, एचटी मिडीया अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
हा 14 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ॲडॉब फोटोशॉप, ॲडॉब इलुस्ट्रेटर, एचटीएमएल, जावा स्क्रीप्ट इतर लॅग्वेजच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. यानंतर तुम्हाला वेब डेव्हलपर, वेब डिझायनर म्हणून नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
हा 29 महिन्यांचा अभ्यासक्रम असून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्केचिंग असेंन्शियल, ग्राफिक फंडामेंटल, डिजीटल इमेज ट्रान्सफॉर्मेशन, डिजीटल थ्रीडी ग्राफिक, वेब लेआऊट, क्रिएटिंग वेब पेज इत्यादी विषयांची माहिती मिळते. वेब डेव्हलपर म्हणून तुम्ही स्वत:चा व्यवसायही करू शकता.
हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम असून प्रवेश घेण्यासाठी 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हा तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. प्रवेश घेण्यासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बेसीक ऑफ आर्ट, गेम थेअरी, गेम कॉन्सेप्ट आर्ट, कॉन्सेप्ट डिझाईन, इन्ट्रोड्युक्शन टू थ्रीडी, ॲनिमेशन फॉर गेम इत्यादी विषयांची माहिती मिळते.
हा आठ महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून 10+2 उत्तीर्ण असलेले विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात. वेब ॲनिमेशन, इलुस्ट्रेशन फॉर वेब, टायपोग्राफी डिझाईन इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश यामध्ये आहे.
हा 10 महिन्याचा अभ्यासक्रम असून 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये स्क्रीप्टरायटींग फॉर ॲनिमेशन, क्रिएटींग डिजीटल आर्ट, ॲक्टिंग ॲण्ड व्हाईस कॅरेक्टरायझेशन, बॉडी लॅग्वेज ॲण्ड एक्सप्रेशन इत्यादी विविध विषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश या कोर्समध्ये आहे. सीएनबीसी आवाज, आयबीएम, सहारा ग्रुप, सब टी.व्ही अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा असून १० +२ उत्तीर्ण विद्यार्थी या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
डिझाईन क्षेत्रात ८७२ महाविद्यालये आहेत. पुढील भागात आपण प्रोडक्ट, इंडस्ट्रीयल डिझाईन, इंटेरियर डिझाईन संदर्भातील काही शिक्षणक्रमांची माहिती घेऊ.
लेखिका - श्रद्धा मेश्राम-नलावडे
meshram.shraddha@gmail.com
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 3/19/2020