भारत सरकारच्या लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित इंडो जर्मन टुल रुम संस्था औरंगाबाद येथे स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने विविध तांत्रिक अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतात. संस्थेने नुकतीच या महिन्यापासून सुरु होणाऱ्या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची घोषणा केली आहे. अभ्यासक्रमाचे नाव व त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम शुल्क आदि माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अल्प मुदतीचे हे अभ्यासक्रम 45 दिवसांचे असून दररोज 2 तास शिकविण्यात येतील. अभ्यासक्रमाची नोंदणी फी प्रत्येकी रु. 300/- आहे.
सी प्रोग्रामिंग व सी ++ प्रोग्रामिंग या अभ्यासक्रमासाठी उमेदवार एस.एस.सी. पास असावेत. पहिल्या अभ्याक्रमाचे शुल्क रु.2500/- तर दुसऱ्या अभ्यासकमाचे शुल्क रु. 3000/- इतके आहे.
जावा, व्हीबी नेट, अेएसपी नेट, एसक्युएल या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हे कुठल्याही विषयात पदवीधर असावेत. जावा अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी रु.5000/- व व्हीबी नेट व अेएसपी नेट अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी रु. 5500/- तर एसक्युएल या अभ्यासक्रमासाठी रु. 5000/- इतके शुल्क आहे. या व्यतिरिक्त नोंदणी आणि अभ्यासक्रमाच्या शुल्कावर 18 टक्के जीएसटी कर उमेदवारांना भरावा लागेल. या अभ्यासक्रमास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रमाच्या तुकड्या 9 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर पासून सुरु होतील.
संस्थेचा पत्ता: इंडो जर्मन टूल रुम, पी.31, एमआयडीसी एरिया चिकलठाणा, औरंगाबाद – 431 006 (महाराष्ट्र)
दूरध्वनी क्रमांक: 0240-2486832, 2482593, 2470541
फॅक्स क्र.2040-2484028.
ई-मेल- training@igtr-aur.org.
वेबसाईट – www.igtr-aur.org
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/8/2020