भारत सरकारच्या रसायने व खते मंत्रालयांतर्गत असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील युवक, युवतींकरिता प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उमेदवारांना मोफत कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात येईल.
इंजेक्शन मोल्डिंग मशिन ऑपरेशन हा अभ्यासक्रम सात महिने कालवधीचा आहे. सीएनसी लेथ प्रोग्रामिंग फॉर प्लास्टिक इंडस्ट्रियल (सीएनसी-एल) व सीएनसी मीलिंग प्रोग्रामिंग ॲण्ड ऑपरेशन फॉर प्लास्टिक इंडस्ट्रियल (सीएनसी-एम) हे दोन्ही अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचे आहेत.
या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता किमान 8 वी पास आहे. तर वयोमर्यादा 18 ते 28 इतकी आहे. या अभ्यासक्रमाकरिता प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्वावर कागदपत्रांच्या छाननीनंतर प्रवेश देण्यात येईल. उमेदवार चालू वर्षात कुठल्याही संस्थेचा विद्यार्थी नसावा.
हे प्रशिक्षण पूर्णवेळ कालावधीचे असून अनिवासी आहे. प्रशिक्षणार्थीना स्वत: राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी लागेल. अर्ज वाटप 6 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या दरम्यान होईल तर प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख 25 ऑक्टोबर 2017 अशी आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.cipet.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
अर्ज मिळण्याचे व नोंदणीचे ठिकाण : सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नोलॉजी (सीपेट),प्लॉट नं.जे 3/2, एमआयडीसी, औद्योगिक वसाहत, चिकलठाणा, औरंगाबाद-431 006 किंवा श्री.प्रवीण बी.बच्छाव किंवा श्री.निलेश पिंपळे, फोन नं. 0240-2478316/317 मो.9325687905,9325688710 या क्रमांकावर संपर्क साधावा. अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लेखक - देवेंद्र भुजबळ,
संचालक माहिती औरंगाबाद
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 4/22/2020