आदरातिथ्य क्षेत्रात करियर ही संकल्पना अस्तित्वात नव्हती तसा फारसा आधी विचारही होत नव्हता. आदरातिथ्य हा शिष्टाचार नाहीतर औपचारिकतेचा भाग समजला जात असे. मात्र, जलद गतीने बदललेल्या प्रत्येक क्षेत्रात आदरातिथ्य महत्त्वाचे ठरले आहे. सेवा उद्योग क्षेत्रात आदरातिथ्य क्षेत्र नव्याने विकसीत होत आहे. यात करियर करण्याच्या संधीही वाढत आहेत. आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी…हॉस्पिटॅलिटी हा एक वेगळा शिक्षणक्रम विकसीत झाला असून, यासंबंधीत क्षेत्र आणि हॉस्पिटॅलिटी असे शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची मागणीही वाढत आहे.
या शिक्षणक्रमात इव्हेंट मॅनेजमेंट, हवाई सेवा, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, कॅटरिंग, व्यवस्थापन, एव्हिएशन आदी संबंधित क्षेत्राचा समावेश होतो. या क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास त्या क्षेत्राशी संबंधित शिक्षणक्रम आणि आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी संबंधित शिक्षणक्रम पुर्ण करणे आवश्यक आहे.
बी.एस.सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज – हा तीन वर्षाचा शिक्षणक्रम असून, १२ वी मध्ये किमान ४५ टक्के असणे आवश्यक आहे. हिलटॉन, हॉलिडे इन, द पार्क हॉटेल, केएफसी, ओबेरॉय हॉटेल, पिझ्झा हट, ली मेरिडीयन आदींमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
बी.एस.सी. इन कॅटरिंग सायन्स ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट - हा शिक्षणक्रम ३ वर्षाचा असून, १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शिक्षणक्रमानंतर तुम्हाला हयात, ताज हॉटेल, आयटीसी आदींसारख्या नामांकित व्यवसाय समुहात काम करण्याची संधी प्राप्त होते.
बी.एस.सी. इन हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी - हा ३ वर्षाचा शिक्षणक्रम असून, १२ वी किमान ५० टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नामांकित हॉटेल व्यवसाय क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते.
बी.एस. सी. इन टूरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट - हा देखील ३ वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10 +2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हयात, आयटीसी, ओबेरॉय, लीला कॅम्पीन्स्की, ताज ग्रुप ऑफ हॉटेल आदी नामांकित हॉटेल व्यवसाय क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते.
बी.एस. सी. इन हॉटेल मॅनेजमेंट - हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्राऊन हॉटेल, हॉलीडे इन, आयटीसी वेलकम ग्रुप, द पार्क हॉटेल, आदी नामांकित हॉटेल व्यवसायात काम करण्याची संधी प्राप्त होते.
बी.एस.सी. इन एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट - हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, 12 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंडियन आर्मी, ओएनजीसी, सहारा इंडिया, विप्रो, डेल, एचसीएल आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
बी.एस. सी. इन एअरलाईन्स, टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी - हा तीन वर्षाचा शिक्षणक्रम असून, 50 टक्केसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असेल तर आयटीएम इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , नवी मुंबई, आर्मी इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, कर्नाटका, इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई, ओबेरॉय सेंटर ऑफ लर्निंग ॲण्ड डेव्हलपमेंट, दिल्ली, इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, औरंगाबाद, इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चेन्नई यासारखे अनेक सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये संबंधित क्षेत्राचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. या संस्थांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
लेखीका : श्रद्धा मेश्राम नलावडे
meshram.shraddha@gmail.com
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 8/5/2020