आर्किटेक्चर म्हणजे फक्त बांधकामाचे नियोजन, डिझाईन एवढेच नसून सभोवतालच्या भौतीक परिस्थितीत दीर्घ काळ टिकणारी आणि आपल्या वैशिष्ट्याने ओळखली जाणारी वास्तू तयार करणे होय. या क्षेत्रात करियरच्या आज मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करियर करताना तुम्ही स्वत:ची ओळख निर्माण करू शकता.
क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास भारतात 478 महाविद्यालय उपलब्ध आहेत.
डिप्लोमा इन इंटिरियी ॲण्ड आर्किटेक्चरल डिझाईन - एक महिन्याचा हा पदविका शिक्षणक्रम आहे. प्रवेश पात्रतेसाठी10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शिक्षणक्रमाची अंदाजे एक लाख रूपए शैक्षणिक शुल्क असून, रिलायन्स रिटेल, प्राईम फोकस, आयटीसी अशा नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
डिप्लोमा इन इंटिरियर आर्किटेक्चर डिझाईन - हा 260 तासांचा शिक्षणक्रम असून, 10+2 शिक्षणक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे.
आर्किटेक्चर पदवी - हा पाच वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, साधारण 7 लाख इतके शिक्षणक्रम शुल्क असते. 12 वर्षे शालेय शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. आर्किटेक्चर डिझाईन, आर्किटेक्चर ग्राफीक स्कील्स, एन्व्हार्मेंटल स्टडीज, कम्युनिकेशन स्किल्स, बिल्डींग मटेरियल ॲण्ड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आदी विषयांचा समावेश अभ्यासक्रमात आहे.
इंटीरियर स्पेस ॲण्ड फर्निचर डिझाईन - हा चार वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. साधारण 16 लाख शैक्षणिक शुल्क असून, 10 + 2 शिक्षणक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फंडामेंटल ऑफ डिझाईन, डिझाईन ड्रॉईंग, डिजीटल मेथड आदी विषयांचा समावेश अभ्यासक्रमात आहे. टाटा मोटर्स, टेस्को, एचबी डिझाईन, निलकमल आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
सर्टिफिकेट इन लॅण्डस्केप डिझाईन - हा सहा महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 +2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लॅण्डस्केप डिझाईन, क्लायमेट लॅण्डस्केप डिझाईन, फ्लोरिंग इन लॅण्डस्केप डिझाईन, लॅण्डस्केप इन इंटिरियर ॲण्ड एक्स्टीरियर आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो.
स्पेशलायझेशन प्रोग्राम इन इंटिरियर डिझाईन - हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. साधारण 2 ते 2.50 लाख एवढे शिक्षणक्रम शुल्क असते. यास प्रवेश घेण्यासाठी 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्टुडिओ फॉर रेसिडेन्शीयल स्पेस, इंटेरियर कन्स्ट्रक्शन, असेंशल ऑफ मटेरियल ॲण्ड सिस्टम आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो.
डिप्लोमा इन इंटिरियर ॲण्ड अप्लाएड आर्किटेक्चर डिझाईन - हा एक वर्षाचा पदविका शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक असून, तीन लाख रूपए साधारण शिक्षणक्रम शुल्क आहे.
पदव्युत्तर पदवी इन लॅण्डस्केप आर्किटेक्चर - दोन वर्षाचा पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम असून, साधारण तीन लाख रूपए शिक्षणक्रम शुल्क आहे. टाटा इन्श्युरन्स, टीव्हीएस मोटर्स, नोकिया, मोटोरोला, आयबीएम आदी नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
अमेटी विद्यापीठ, पनवेल, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, डब्लुएलसी कॉलेज इंडिया, मुंबई, जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, रिझवी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर बांद्रा, डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अशी अनेक महाविद्यालये मुंबईसह भारतात कार्यरत आहेत.
लेखिका - श्रदधा मेश्राम
meshram.shraddha@gmail.com
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/16/2020