आपल्याला जो छंद आहे किंवा उपजत जी कला आहे, त्यात करियर करायचा विचार फारसा रूढ नव्हता. जागतिकीकरण आणि प्रत्येक क्षेत्राची विस्तारणारी व्याप्ती पाहता आता छंद जोपासता असताना किंवा तुम्हाला उपजत असलेल्या केलेला प्रोफेशन बनवू शकता. ठराविक क्षेत्रात करियर करण्याच्या सिमारेषा पुसल्या गेल्या असून, करियरचे क्षितीज विस्तारले आहे. आपल्या आवडत्या कलेतून छंद करण्यासंदर्भातील बॅचलर इन फाईन आर्ट्स मधील काही शिक्षणक्रम पाहू -
बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, साधारण 3 लाख शैक्षणिक शुल्क आहे. यामध्ये अनेक उपविभाग असून, पदवी आणि पदविका शिक्षणक्रमही उपलब्ध आहेत.
बी.एफ.ए. इन ॲनीमेशन - चार वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डिझाईन फॉर ॲनीमेशन, प्रिंट मेकींग, फॉर बिझनेस लॅग्वेज, ओपन इलेक्टीव्ह कोर्सेस हे विषय अभ्यासक्रमात असून, साधारण 3 लाख शिक्षणक्रम शुल्क आहे.
बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स + मास्टर ऑफ फाईन आर्ट्स (पेंटींग) - हा सहा वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. 12 वी मध्ये किमान 45 टक्के असणे आवश्यक आहे.
बी.एफ.ए. इन म्युसिक व्हायोलीन - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. या प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एम.फील. इन म्युझीक - एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवीला 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
बी.ए.इन. म्युझीक - हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एम.ए. इन इन्स्ट्रुमेंटल म्युझिक- हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. म्युझिक मधून बी.ए.पूर्ण असणे आवश्यक आहे.
बी.ए.इन पफॉर्मिंग आर्ट्स- हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. साधारण 2 लाख शैक्षणिक शुल्क आहे.
कोर्स इन म्युझिक - हा 120 तासांचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. शिक्षणक्रम शुल्क 4 हजार रूपए आहे. टेक महिंद्रा, एशियन पेंट, विप्रो, झोमॅटो आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
डिप्लोमा इन हिंदूस्थानी क्लासिकल व्होकल / लाईट व्होकल / सितार / तबला - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
गाणे विषयात पदविका (डिप्लोमा इन सिंगींग) - हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण 4 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे.
सर्टीफीकेट इन व्हाईस कल्चर / व्हाईस ओव्हर / डबिंग ॲण्ड फ्री कमेंट्री - हा तीन महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण 30 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे.
नृत्यकलेत पदवी - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. याचे एक लाख 75 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे. बँक ऑफ अमेरिका, विप्रो, गुगल आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
सर्टीफीकेट इन फाउंडेशन फोटोग्राफी - हा दोन महिन्याचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण 13 हजार शैक्षणिक शुल्क आहे. प्राईम फोकस, रिलायन्स रिटेल, लाईफ ओके आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
डिप्लोमा इन ऑटोमोटीव्ह शिल्पकला - हा दोन वर्षाचा पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण 5 लाख रूपए शैक्षणिक शुल्क आहे. अँकर पॅनासोनिक, इंदी डिझाईन, बॉम्बे डिझाईन हाऊस, बँग डिझाईन आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
एम.एफ.ए. इन सिरॅमिक - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवीमध्ये किमान 50 टक्के असणे आवश्यक आहे.
बी.एफ.ए. इन सिरॅमीक - चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम असून, 12वी मध्ये 50 टक्के असणे आवश्यक आहे.
एम.एफ.ए. इन पेंटींग (भित्तीचित्र) - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.
सर्टीफीकेट इन ॲक्टींग - हा सहा महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, 90 हजार रूपए शैक्षणिक शुल्क आहे.
भारतात 35 महाविद्यालयात ड्रामा (नाटक) विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. शिल्पकलेचे 21 महाविद्यालय भारतात आहेत. फोटोग्राफीचे 271 महाविद्यालये आहेत. भारतात संगीताचे 113 महाविद्यालये आहेत. एम.एफ.ए. इन पेंटींगचा शिक्षणक्रम वीस्वा भारती विद्यापीठ, वेस्ट बंगाल येथे उपलब्ध आहे. ग्राफीक आर्ट कॉलेजचे 46 महाविद्यालये आहेत. नृत्य आणि नृत्य दिग्दर्शनचे भारतात 51 महाविद्यालये आहेत.
लेखिका : श्रद्धा मेश्राम नलावडे
meshram.shraddha@gmail.com
माहिती स्रोत : 'महान्यूज'
अंतिम सुधारित : 7/25/2020