অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कौशल्य, शिक्षणावर आधारित करियर - इव्हेंट मॅनेजमेंट

कौशल्य, शिक्षणावर आधारित करियर - इव्हेंट मॅनेजमेंट

मोठ्या आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ ही संकल्पना मध्यमवर्गीयांपर्यंतच नाहीतर ग्रामीण भागापर्यंतही पोहोचली आहे. लग्न, समारंभ, बारसे, वाढदिवस आदिसारखे समारंभ आता इव्हेंट मॅनेजमेंट टीमकडे दिले यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिले जातात. या कार्यक्रमांबरोबर शहरी भागात इव्हेंट मॅनेजमेंट टीम सोबत पब्लीक रिलेशन टीमही समांतर काम करीत असते. शहरी भागातील सामाजिक, राजकीय, पत्रकार परिषद, संस्था- कंपनीचे मार्केटींग यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट टीम कार्यरत असते. म्हणजेच पूर्वी अतिशय मोजक्या संधी असलेल्या या क्षेत्रात आता हळूहळू करियरच्या संधी दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहेत.  भारतात इव्हेंट मॅनेजमेंट शिक्षणक्रम असलेली 90 महाविद्यालय कार्यरत आहेत.

हुनर से रोजगार - इव्हेंट फॅसिलीटेटर - भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राबविल्या जाणा-या ‘हुनर से रोजगार’ या योजनेअंतर्गत हा शिक्षणक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. हा 6 आठवड्याचा प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. ९० टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना १५०० रूपए विद्यावेतन दिले जाते. १८ ते २८ वय असलेले ८ वी उत्तीर्ण विद्यार्थी या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यसक्रमात हॅण्डलिंग अ गेस्ट ॲण्ड वेस्ट डिस्पोजल, पर्सनल ॲण्ड फुड हायजिन, ऑडीओ व्हीज्युअल ॲण्ड लाईट अरेंजमेंट, हॉल मॅनेजमेंट ॲण्ड प्रॅक्टीकल कम्पोनन्ट, रिस्क असेसमेंट ॲण्ड प्रिकॉशन, प्राईड इन नेशन ॲण्ड टुरिझम आदी विषयांचा समावेश आहे.

एम.बी.ए. इन इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड पी.आर. - हा दोन वर्षाचा पदव्युत्तर पदवी पुर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. अदानी ग्रुप, फीक्की, फ्युजन इव्हेंट, द टाईम्स ऑफ इंडिया, डीएनए नेटवर्क आदीसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट - हा ११ महिन्याचा अर्धवेळ शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 10+2 पूर्ण असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात इव्हेंट मॅनेजमेंटची ओळख, ब्रँड मॅनेजमेंट ॲण्ड मार्केटिंग, कम्युनिकेश ॲण्ड प्रेझेंटेशन स्कील, इव्हेंट प्लॅनिंग ॲण्ड कोस्टींग, क्रीएटीव्ह ॲण्ड कोलॅटरल आदी विषयांचा समावेश असतो.

बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट - हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम असून, यास प्रवेश घेण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बी.एस.स्सी. इन रिसॉर्ट ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंट - हा तीन वर्षाचा शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जेएसडब्लु स्टील, गुगल, गोदरेज, एचसीएल, मोटोरोला, ओबेरॉय आदी नामांकित संस्थांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट - एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. ९९ एकर डॉट कॉम, इंडिगो एअरलाईन, एनडीटीव्ही, बालाजी टेलीफिल्म आदी नामांकित संस्थामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

सर्टीफिकेट इन इव्हेंट मॅनेजमेंट - हा ६ महिन्याचा प्रमाणपत्र शिक्षणक्रम असून, 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एम.ए. इन पब्लीक रिलेशन ॲण्ड इव्हेंट + पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन ॲण्ड इव्हेंट - हा २ वर्षाचा पदव्युत्तर पदवी शिक्षण शिक्षणक्रम आहे. विविध मिडीया कंपनी आणि पी. आर. एजन्सीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

पोस्ट ग्रॅज्युएट पब्लिक रिलेशन ॲण्ड इव्हेंट - हा एक वर्षाचा पूर्ण वेळ पदविका शिक्षणक्रम आहे. इव्हेंट मॅनेजमेंटची ओळख, ऍस्थेटिक ॲण्ड डिझाईन, पीआर ॲण्ड प्रमोशची ओळख, व्हीज्युअल ॲण्ड कार्पोरेट कम्युनिकेशन आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश्‍ आहे. अरविंद ब्रँण्ड, विल्स लाईफ स्टाईल, पँटालून आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

इव्हेंट मॅनेजमेंट - हा तीन महिन्याचा अर्ध वेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी १० + २ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोनी, सिमेंस, युनीटेक, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमीटेड, रेड एफएम आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

प्रोफेश्नल सर्टीफिकेट प्रोग्राम इन इव्हेंट मॅनेजमेंट - हा ११ महिन्याचा पुर्ण वेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. १० +२ उत्तीर्ण आणि या क्षेत्रातील २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे

सर्टीफिकेट प्रोग्राम इन कार्पोरेट इव्हेंट ॲण्ड ब्रँड ओरिएन्टेशन – हा ३ महिन्याचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे.

डिप्लोमा इन रिटेल ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंट - हा ६ महिन्याचा पुर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कार्पोरेट कम्युनिकेशन ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंट - हा एक वर्षाचा पुर्ण वेळ पदव्युत्तर पदवी पदविका शिक्षणक्रम आहे. डीएलएफ, संपर्क सर्च, मुद्रा कम्युनिकेशन्स, मेडिसॉन मिडीया आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

लेखिका : श्रद्धा मेश्राम

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate