অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भरारी करिअरची...व्यावसायीक पायलटची संधी

भरारी करिअरची...व्यावसायीक पायलटची संधी

विमानाचे आकर्षण तर लहान मूल ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आहे. अगदी कवितेतही कवींनी आपल्याला पंख असते तर किती भारी झाली असतं असे म्हटलेले आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असून देश विदेशी दळणवळणाच्या सोयीसुविधा सहज उपलब्ध झाल्या आहेत. सातासमुद्रापार माणूस काही वेळातच जावू शकतो. ‘हमारा एक सपना था उडान भरने का’ या आशयाचे संवादही आपण चित्रपटात ऐकतो. मोठ्या प्रमाणात विस्तारत जाणाऱ्या या क्षेत्रात येणाऱ्या काळात चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारतीय एवीएशन इंडस्ट्री जगातील महत्वाची म्हणून ओळखली जाते. चला तर मग या क्षेत्रातील करिअरच्या नेमक्या संधी जाणून घेवूयात खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

पात्रता

या क्षेत्रात प्रवेशासाठी म्हणजेच कमर्शिअल पायलट बनण्यासाठी स्टुडंट पायलट लायसन्स(एसपीएल) आणि प्रायव्हेट पायलट लायसन्स(पीपीएल) गरजेचे असते. यासाठी प्रशिक्षणार्थी बारावी(विज्ञान) शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासहित उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तो शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्याही तंदुरुस्त असायला हवा. त्याचे वय कमीत कमी १६ वर्षे असावे. त्यानंतर डायरेक्ट्रेट जनरल ऑफ सिविल एवीएशन, गव्हर्मेंट ऑफ इंडिया(डीजीसीए) इथे रजिस्ट्रेशन करावे लागते. डीजीसीए रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तोंडी परीक्षा द्यावी लागते आणि ती उत्तीर्ण झाल्यानंतर एसपीएल प्रमाणपत्रासाठी उमेदवार पात्र होतो. एसपीएल प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रायव्हेट पायलट लायसन्सची आवश्यकता भासते. अर्थात हे लायसन्स मिळाल्यानंतर उमेदवार उड्डाण करण्यासाठी योग्य होतो. पीपीएल प्रमाणपत्रासाठी लेखी परीक्षा पास व्हावी लागते. यासाठीही उमेदवार बारावी (विज्ञान) असून त्याचे वय कमीत कमी सतरा वर्षे हवे. तसेच आर्म्ड फोर्सेज सेन्ट्रल मेडिकल एस्टाब्लीशमेंट(एएफसीएमई)या संस्थेकडून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

या विषयांची होते ओळख
  • एअर रेग्युलेशन्स
  • एविएशन मेटीओरोलॉजी फॉर एअर नेविगेशन
  • एअरक्राफ्ट इंजिन(टेक्निकल आणि स्पेसिफिक)
  • प्लॅनिंग अँड कम्युनिकेशन (रेडीओ आणि वायरलेस ट्रान्समिशन)
  • आवश्यक गुण

    यशस्वी पायलट होण्यासाठी उत्तम दृष्टी हवी. तसेच उमेदवार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सदृढ असायला हवा. उत्साही आणि आशावादी व्यक्तिमत्व हवे. प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याची तयारी हवी. तसेच डोळे, हात आणि मेंदू यात समन्वय असणे गरजेचे आहे.

    वेतनसंधी

    एका व्यावसायिक पायलटच्या पगाराची सुरुवात एक लाखापासून होऊन पुढे टी प्रति महिना चार लाखांपर्यंत होऊ शकते. अनुभव प्राप्तीनंतर उत्तम वेतन मिळते.

    संधी

    करिअरच्या सुरुवातीस छोट्या स्वरूपातील एअरक्राफ्टमध्ये ट्रेनी पायलट म्हणून नोकरी मिळते. पुरेश्या अनुभवानंतर एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्स तसेच खाजगी क्षेत्रातील जेट एअरवेज, सहारा, एअर डेक्कन व आंतरराष्ट्रीय पातळीवरील एअर कॅनडा, कंतास, लुफ्तांसा, युनाईटेड एअरलाईन्स, ब्रिटीश एअरवेज या कंपन्यात काम मिळू शकते.

    प्रशिक्षण खर्च

    प्रशिक्षण फी प्रत्येक संस्थेनुसार वेगवेगळी असते. भारतात सीपीएल(कमर्शिअल पायलट लायसन्स) २०० तासांच्या उड्डाणासाठी २२ ते २५ लाखांपर्यंत फी असते. यात बोर्डिंग, युनिफॉर्म आदी बाबींचा समावेश असतो. तसेच मल्टीपल इंजिनच्या उड्डाणाच्या रक्कमेचा यात समावेश केला जात नाही. परदेशातही प्रशिक्षण खर्च १६ ते २२ लाखांपर्यंत जातो. हे प्रशिक्षण १४ ते १८ महिने चालते.

    प्रशिक्षण संस्था
  • इंडियन एविएशन अॅकेडमी, मुंबई
  • एशियाटिक इंटरनॅशनल एविएशन अॅकेडमी, इंदौर
  • ब्लू डायमंड एविएशन, पुणे
  • एक्यूमेन स्कूल ऑफ पायलट ट्रेनिंग, दिल्ली
  • इंटरनॅशनल स्कूल ऑफ एविएशन, आईएसए, नवी दिल्ली
  • लेखक  : सचिन के. पाटील ९५२७७७७७३२

    माहिती स्रोत : महान्यूज

    अंतिम सुधारित : 7/13/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate