অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जनगणना २०१२

जनगणना दर दहा वर्षांनी होते.

पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली.
१८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.
१९५१ ला स्वतंत्र भारतात पहिली जनगणना पार पडली.
१९५१ ला स्वतंत्र भारताचा पहिली जनगणना पार पडली.
एकूणातील १५ वी जनगणना तर स्वातंत्र्यानंतरची ७ वी जनगणना.
१९३१ ला जातीनिहाय जनगणना करण्यात आली. त्यानंतर २०११ ला जातीनिहाय जनगणना त्रिपूरा राज्यातील सखाला गावचे बदरुई देववर्मा यांच्या नोंदीने सुरुवात झाली.
१९२१ हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते.
भारताचे जनगणना आयुक्त सी चंद्रमोली (१८ वे)
भारताचे पहिले जनगणना आयुक्त डब्ल्यु प्लॉडेन.
भारताचे पहिली जनगणना इजिप्तमध्ये झाली.
मृत्यूगणना करणारे पहिले राज्य – कर्नाटक.
२०११ च्या जनगणनेची सुरुवात १ एप्रिल २०१० रोजी झाली.
पहिली नोंदणी प्रतिभाताई पाटील यांची करण्यात आली.
घोषवाक्य ‘आपली जनगणना आपले भविष्य ’
शुभंकर – प्रगणक शिक्षिका
जनगणना एकूण १८ भाषेत करण्यात आली.
एकूण खर्च २२ कोटी
जनगणना कायदा – १९४८
जनगणना नियन – १९९०
जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा १७.५%
लोकसंख्येच्या बाबतीत चीन प्रथम क्रमांकावर तर भारत दुस-या क्रमांकावर

ही जनगणना दोन टप्प्यात पार पडली.

१) १ एप्रिल २०१० ते जुलै २०१० २) ९ फेब्रुवारी २०११ ते २८ फेब्रुवारी २०११
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू काश्मीर या हिमच्छादीत प्रदेशात ही जनगणना ११ सप्टेंबर २०१० ते ३० सप्टेंबर २०१० पहिला राऊंड तर दुसरा राऊंड १ ऑक्टोंबर २०१० ते ५ ऑक्टोंबर २०१० या काळात पार पडली.
सन १९३१ पर्यंत जनगणना करण्यासाठी डे – फॅक्टो पध्दत वापरली जात होती.
या पध्दतीनुसार पूर्व निर्धारीत तीन आठवड्याच्या काळात देशभर सर्वत्र प्रश्नावलीच्या साहाय्याने सर्वेक्षण केले जात होते व फेरतपासणी राऊंड घेऊन देशातील लोकसंख्या निश्चित केली जात होती. यामध्ये जन्म, मृत्यू, स्थलांतर, वय, लिंग, शिक्षण या बाबींचा विचार केला जात होता.
सन १९३१ पासून सिंक्रोनाझड्‍ डे – फॅक्टो पध्दतीचा अवलंब केला गेला.
या पध्दतीनुसार एका विशिष्ट रात्री देशात सर्वत्र एकत्रितपणे सर्वेक्षण करुन माहिती गोळा केली जात होती. या पध्दतीनुसार एकाच वेळी खूप मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सन १९४१ मधील जनगणनेपासून विस्तारीत डे – फॅक्टो पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.
विस्तारीत डे – फॅक्टो पध्द्त म्हणजे दोन टप्प्यात
जनगणना यंत्रणा –भारतीय जनगणना विभागाचे कार्य मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते. तर याकरिता रजिस्ट्रार जनरल व जनगणना कमिशनरचे कर्यालय असून ते मिनिस्ट्री व होम अफेअर्सची संलग्न आहे. राज्यपातळीवर डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन, प्रमुख जनगणना अधिकारी, चार्ज ऑफीसर, जिल्हा अधिकारी, तहसिलदार, पर्यवेक्षक व सर्वेक्षक अशी साखळी असते. प्रत्यक्ष जनगणना करण्याचे काम सर्वेक्षक करीत असले तरी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शक करणे, प्रशिक्षण देणे, तंत्रिक मदत पुरविण्याचे कार्य वेगवेगळ्या स्तरावरून असते.

लेखक - डॉ. चिदानंद आवळेकर

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate