देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि आव्हान मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये मराठी टक्का वर्षागणिक वाढू लागला आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी अलिकडच्या काळात विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था राज्यात कार्यरत आहेत. शासनासह स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे यांच्या अखत्यारीत या प्रशिक्षण संस्था व केंद्रे सुरू आहेत.
नागरी सेवेमध्ये देशात मराठी टक्का वाढावा यासाठी 1976 मध्ये मुंबईत राज्य व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याच धर्तीवर 1985 मध्ये नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले.
त्यानंतर 2013 मध्ये नाशिक व अमरावती येथे नव्याने 3 प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर्स सुरू करण्यात आले आहे. त्याशिवाय जानेवारी 2013 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेकडून उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील प्रत्येक भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षणासाठी प्रायोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या 10 विद्यार्थ्यांना मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक येथे प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्य प्रशासकीय सेवा संस्था, मुंबई
प्रवेश अट - प्रवेशासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेतील पदवीधर हवा आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी हवा.
वयोमर्यादा - खुला वर्ग - 21 ते 30 वर्ष, अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष, इतर मागासवर्ग, एसबीसी, एनटी-बी, एनटी-सी, एनटी-डी, व्हीजेसाठी वयोमर्यादा 21 ते 33 वर्ष
प्रवेश प्रक्रिया - दरवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात संस्थेमध्ये प्रवेश अर्ज उपलब्ध.
प्रवेश परीक्षा - डिसेंबरमध्ये प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या काळात प्रशिक्षण दिले जाते
एकूण जागा - 100
संपर्कासाठी पत्ता - हजारीमल सोमाणी मार्ग,
सीएसटी स्थानकाजवळ, मुंबई - 400001 दूरध्वनी
क्रमांक - 022-22070942 / 22061071,
संकेतस्थळ – www.slac.ac.in
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
पात्रता - कोणत्याही शाखेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुण
राखीव जागा - अनुसूचित जातींसाठी 20 जागा राखीव आहेत (14 पुरुष, 6 महिला), इतर मागासवर्गासाठी 14 (9 पुरुष, 3 महिला) तर अल्पसंख्याकांसाठी 8 जागा राखीव (5 पुरुष, 3 महिला)
प्रवेशासाठी वयोमर्यादा - 21 ते 35 वर्ष
उत्पन्न मर्यादा - एक लाखापेक्षा कमी
प्रवेश - या संस्थेतील प्रवेशासाठी सप्टेंबर महिन्यात विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होते. त्यानंतर प्रवेश परीक्षा होऊन निवड समितीमार्फत उमेदवाराची मुलाखत घेऊन प्रवेश दिला जातो.
संपर्क दूरध्वनी - 0240 - 240043137
ईमेल – barnuaur@born4vsnl.net.in
संकेतस्थळ – www.barnuniversity.ac.in
प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर, कोल्हापूर
पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवीधर ऑक्टोबर महिन्यात प्रवेशासाठी जाहिरात.
प्रवेश परीक्षा - यूपीएससीच्या जनरल स्टडीजवर आधारित 100 गुणांची परीक्षा.
उपलब्ध जागा - 60
प्रशिक्षण - जानेवारी ते प्रिलिम परीक्षेपर्यंत.
निर्वाहभत्ता - एक हजार रुपये प्रतिमाह.
पत्ता - राजाराम कॉलेज कॅम्पस, जिमखाना बिल्डिंग, कोल्हापूर - 416004
संपर्क क्रमांक- 0231-2528351, kip_iastree@sancharnet.in
संकेतस्थळ – http://www.preias-kop.in
प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर, नागपूर
प्रवेश अट- कोणत्याही शाखेतील पदवीधर.
वयोमर्यादा - 21 वर्ष
जाहिरात - नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित केली जाते.
प्रवेश - डिसेंबरमध्ये प्रवेश दिला जातो.
प्रवेश परीक्षा - सामान्य ज्ञानावर आधारीत 100 गुणांची परीक्षा.
उपलब्ध जागा - 60
प्रशिक्षण कालावधी - जानेवारी ते मे
निर्वाह भत्ता - एक हजार रुपये प्रतिमाह.
पत्ता-ओल्ड मॉरिस कॉलेज बिल्डिंग, सिताबर्डी, नागपूर - 440001 संपर्क क्रमांक - 0712-2565626
पुणे विद्यापीठाचे स्पर्धा परीक्षा केंद्र
प्रवेश परीक्षा - 100 गुणांची लेखी परीक्षा, मुलाखतीसाठी 30 गुण आणि 20 गुण आधीच्या शैक्षणिक कामगिरीसाठी
उपलब्ध जागा - 60
प्रशिक्षण कालावधी - ऑगस्ट ते जून
पत्ता - स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे - 411007 संपर्क क्रमांक - 020-25690342, 25601117,
संकेतस्थळ – www.unipune.ernet.in
डॉ. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे
जाहिरात - जुलैमध्ये जाहिरात प्रकाशित केली जाते.
प्रवेशासाठी अट - खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही शाखेतून 55 टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश घेता येतो. तर राखीव जागांसाठी 50 टक्के गुणांची अट आहे.
प्रवेश अर्ज - 1 ते 25 ऑगस्ट या कालावधीत प्रवेश अर्ज उपलब्ध असतात.
प्रवेश परीक्षा - सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सामान्य ज्ञानावर आधारित लेखी परीक्षा
आणि मुलाखत घेतली जाते.
उपलब्ध जागा - 50
प्रशिक्षण कालावधी - ऑक्टोबरमध्ये प्रशिक्षण सुरू होऊन मार्चमध्ये प्रशिक्षण संपते.
पत्ता - प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे
महापालिका जुनी इमारत, पहिला मजला, स्टेशन रोड, ठाणे - 400601 संपर्क क्रमांक - 022- 25386945
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि या संदर्भात अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 1978 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना मुंबईत करण्यात आली. ‘बार्टी’द्वारे कौशल्य विकास, संशोधन, मूल्यमापन, प्रशिक्षण, युवा नेतृत्व, समतादूत प्रकल्पसारख्या अन्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षण
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी ‘बार्टी’च्या वतीने राज्यातील अनुसूचित जाती- जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क व अनिवासी कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
‘बार्टी’च्या पुणे येथील स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासह सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, सोलापूर विद्यापीठ सोलापूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील प्रशिक्षण केंद्रावर स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
प्रवेश क्षमता- प्रत्येक विद्यापीठात 25 जागा. महिलांसाठी 30 टक्के तर दिव्यांग व्यक्तींसाठी 3 टक्के जागा आरक्षित
पात्रता- उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
नागरी सेवा परीक्षेसाठी त्या वर्षात बसण्यास पात्र असावा. वयाची 21 वर्षे पूर्ण असावीत. उमेदवाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष रुपयांच्या आत असावे.
सुविधा- निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारांस दरमहा 4 हजार रुपये विद्यावेतन आणि 6 हजार रुपये किंमतीचा पुस्तक संच दिला जाईल.
अनुसूचित जातीच्या उमेदवारांना पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे युपीएससी (नागरी सेवा) स्पर्धा परीक्षेचे निवासी प्रशिक्षण ‘बार्टी’द्वारे दिले जाते. त्यशिवाय दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षणासाठी उमेदवारांना ‘बार्टी’द्वारे प्रायोजित केले जाते.
बँक, रेल्वे, एलआयसीमध्ये लिपिकवर्गीय पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण ‘बार्टी’ च्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एलआयसी आदी विभागांमध्ये लिपिकवर्गीय वा तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण देण्यात येते. राज्यातील
29 विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाते.
प्रवेश क्षमता - प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण 50 जागा
पात्रता- उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा आणि त्याचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे. किमान 12 वी उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराने दहावीची परीक्षा ग्रामीण भागातून उत्तीर्ण केली असावी किंवा तो ‘क’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातून किंवा शहरी झोपडपट्टी भागातील असावा.
अधिक माहितीसाठी संपर्क - महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, क्वीन्स गार्डन, पुणे-28
संकेतस्थळ : http://barti.maharashtra.gov.in
- वर्षा फडके
विभागीय संपर्क अधिकारी
(लोकराज्य अंकातून)
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/22/2020