महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION- MPSC)महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते. उदा. १) राज्य सेवा परीक्षा२)PSI/STI/ASST.३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा६)न्यायालयीन सेवा परीक्षा७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा८)लिपिक -टंकलेखक परीक्षावेबसाईट :- www.mpsc.gov.inअर्ज करण्यासाठी वेबसाइट:- www.mpsconline.gov.in परीक्षेसाठी पात्रता:- * शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी३) मराठीचे ज्ञान आवश्यक. * वयोमर्यादा - साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत. कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षेअनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षमखेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल. * शारीरिक पात्रता - १) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-पुरूष उमेदवारांकरिता :-उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)छाती - न फुगविता ८४ सें .मी.फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक महिला उमेदवारांकरिता उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)२) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :- पुरूष उमेदवारांकरिता :- उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)छाती - न फुगविता ८४ सें .मी.फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक महिला उमेदवारांकरिता उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-पुरूष उमेदवारांकरिता :-उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)छाती - न फुगविता ८४ सें .मी.फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा . महिला उमेदवारांकरिता उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .लेखक : डॉ. चिदानंद आवळेकर स्त्रोत : महान्यूज