नागपुर विद्यपीठाची स्थापना ५ आगस्ट १९२३ रोजी ६ संलंग्न महविद्यालये व ९२७ विद्यार्थ्यांसह झाली. १९४७ साली पाठयक्रम व विषयांच्या विविध विस्तार आणि सुधारणांमुळे विद्यार्थ्यांची संख्या ९००० पर्यंन्त वाढ्ली. विद्यार्थ्यांच्या बौध्दिक व शारिरिक विकासासाठी ग्रंथालये व क्रीडा सुविधांचा या वर्षात विस्तार केल्या गेला. १९५८ साली कला व सामाजिक शास्त्राचे नवीन विभाग उघड्ल्या गेले. १९६३ व साली अनेक शास्त्रे व इतर शिक्षण विभाग सुरु झाल्यामुळे मोठा विस्तार झाला. १९७२-७३ साली सर्व विभाग मुख्य परिसरातील विशाल इमारतींमध्ये स्थानंतरित झाला.नंतर च्या वर्षांमध्ये अनेक व्यवसायोन्मुख पाठयक्रम जसे व्यवसाय प्रबंधन ललित कला मास कम्युनिकेशन ग्रंथालय शास्त्र शारिरिक शिक्षण आदि.
आपल्या ७८ वर्षांच्या कालावधित विद्यापीठाने अनेक अडचणींचा सामना करीत समाधानकारक प्रगती केली आहे. विद्यापीठावर आसीन कुलगुरु पदावरील व्यक्तींच्या उच्च्य शिक्षणविषयक दुरदृष्टी मुळॆ हे शक्य झाले आहे.त्यांच्या संकल्प व द्दढनिश्चयामुळेच विद्यापीठाच्या प्रगतीस हातभार लागला आहे. सद्या ३७ स्नातकोत्तर शिक्षण विभाग , ३ घटक महाविद्यालये (विधी महाविद्यालय, लक्ष्मीनारायण संस्थान आणि शिक्षण महाविद्यालय) ,८१० महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. ३२७ एकराएवढ्या विस्तृत क्षेत्रात, ७ परिसरामधे सर्व विभाग आणि संस्था पसरलेल्या आहेत.वेगवेगळ्या विभागात वरील संस्था / संलग्न महाविद्यालयांमध्ये खालील कार्यक्रम सुरु आहेत. या व्यतिरिक्त एम फ़ील ,पी एच डी, आणि डाक्टरेट नंतर च्या माध्यमातुन या सर्व ३७ विभाग व ३ महाविद्यालयां द्वारे अनुसंधान कार्यक्रम चालविल्या जत आहेत. विद्यापीठ छंद कायशाला नियमित पणे छायाचित्रण, पेंटिंग, क्ले मोडलिन्ग, सुतार काम व इलेक्ट्रानिक्स या क्षेत्रात प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. वरील औपचारीक कार्यक्रमांना पुरक असे खालील अनौपचारिक
शिक्षण कार्यक्रम स्थानिक गरजेनुसार घेतले जातात.(१)राजीव गान्धी विकास जैव प्रौद्योगिकी केन्द्र, नागपुर विद्यापीठा द्वारा मेन्टेनन्स व आयसोलेशन आफ़ बायोपेस्टिसिडल/बायो फ़र्टीलायझर संस्कृती चे प्रशिक्षण (२) प्रौढ आणि सतत शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातुन विस्तार कार्य.
जागतिकिकरणाच्या संदर्भात उच्च शिक्षणाच्या अल्प मात्रात्मक विकासातुन समाजाच्या न्याय्य अपेक्षा पुर्ण होणार नाहीत. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी निर्मित गुणवत्ता आश्वासन तन्त्रासह गुणात्मक विकासाचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे, (१) जलद विकासासोबत वाटचाल करण्यासाठी इ-शिक्षण व इन्टर कनेक्टिविटी ची सुरुवात (२) आन्तर शिक्षण प्राशिक्षण (३) ग्रामीण व मागास विकास कार्यक्रम (गड चिरोली उपकेन्द्र) (४) गैर शिक्षण प्रशिक्षण (५) ग्रंथालये (६) शिक्षण व अनुसंधानात सुधारणा करण्यासाठी सर्व विभागीय प्रयोगशाळा व पायाभुत संरचना मजबुत करणे.
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 6/28/2020
नागपुर विद्यपीठाची स्थापना ५ आगस्ट १९२३ रोजी ६ संल...