অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोबी, फुलकोबी, मुळा, मोहरी पिकावरील काळी माशी

कोबी, फुलकोबी, मुळा, मोहरी पिकावरील काळी माशी

ही कीड कोबी, फुलकोबी, मुळा, मोहरी आणि तत्सम पिकांवर आढळते. ती भारतात सर्वत्र आढळते. तिच्यामुळे मुळ्याच्या पिकाचे खूप नुकसान होते. तिचे शास्त्रीय नाव अथॅलिया प्रॉक्झिमा  (कुलटेन्थ्रेडिनिडी गण-हायमेनॉप्टेरा) आहे. ती ६ मिमी. लांब व जाड असून शरीरावर काळ्या व नारिंगी खुणा असतात. तिचे पंख धुरकट असून त्यांवर काळ्या शिरा स्पष्ट दिसतात. तिला पंखांच्या चार जोड्या असतात. हिची पूर्ण वाढलेली अळी काळी, गुळगुळीत व १८ मिमी. लांब असते आणि तिच्या शरीरावर पाच लांब पट्टे असतात. त्यांना धक्का लागताच त्या अंगाचे वेटोळे करून जमिनीवर मृतवत्‌ पडून राहतात. त्यावरील पिकांची पाने खाऊन नुकसान करतात. आक्रमणाची तीव्रता जास्त असल्यास पानांच्या फक्त शिराच तेवढ्या शिल्लक राहतात.

द्या पानांच्या ऊतकांत (समान रचना आणि कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) अंडी घालतात. साधारणत: एक आठवड्याने उबून अळ्या बाहेर पडतात. त्यांची वाढ सु. दोन आठवड्यांत पूर्ण होते व नंतर त्या जमिनीत शिरून कोषावस्थेत जातात. कोषावस्था १०–१२ दिवस टिकते. ऑक्टोबर–मार्चच्या दरम्यान ह्या किडीचा पिकांना उपद्रव होतो. एक भाग पायरेथ्रम एक हजार भाग पाण्या‌त मिसळून फवारल्यास ह्या किडीचे नियंत्रण होते.

लेखक- मु. नि.बोरले

स्रोत- मराठी विश्वकोश

vishwakosh.marathi.gov.in

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate